विरोधी पक्षांच्या वतीने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याविषयी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
त्यांनी सांगितले की चंद्रबाबू नायडू हे तेलगू देशम पार्टीचे अत्यंत उंचीचे व सुप्रिम नेते आहेत. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी हैदराबादला आयटी हब बनवले आणि आंध्र प्रदेशलाही कॉर्पोरेट क्षेत्रात उभे केले. त्यांची स्वप्ने मोठी आहेत आणि ते देशाच्या हितासाठी निर्णय घेतात, जे निश्चितच योग्य असतील. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ते असाच निर्णय घेतील, जो त्यांच्या नेतृत्वाची उंची वाढवेल, असे सुदर्शन रेड्डी म्हणाले.
या पार्श्वभूमीवर पत्रकार अशोक वानखेडे आपल्या एक्सरे मधून सांगतात की सध्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.
चंद्रबाबू नायडूंनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत एनडीएच्या उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन जाहीर केले आहे. मात्र, नायडू हे अचानक निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत वळण येऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बी. सुदर्शन रेड्डी यांनी चंद्रबाबू नायडू यांना दूरदृष्टी असलेले नेते म्हटले आणि सांगितले की ते देशाच्या हितासाठी काय योग्य आहे हे जाणून निर्णय घेतात.राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकदा ट्विस्ट आणि टर्न दिले आहेत. त्यामुळे, जरी त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला असला, तरी प्रत्यक्षात काय होईल हे सांगता येत नाही. सुदर्शन रेड्डी यांचे चंद्रबाबू नायडू यांच्याशी जुने संबंध आहेत. ८०-९० च्या दशकात हैदराबादमध्ये वकिली करत असताना ते नायडूंच्या जवळचे सल्लागार होते आणि त्यांनी तेलगू देशम पार्टीसाठी अनेक कायदेशीर सल्ले दिले होते.सुदर्शन रेड्डी सांगतात की, एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांबाहेरचे अनेक खासदार त्यांच्याशी थेट संपर्कात आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत.
ते म्हणाले, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. माझा उमेदवारीचा दावा जनतेच्या समर्थनावर आधारित आहे.”त्यांच्या मते, इंडिया गट ६७% लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे ते बहुसंख्य जनतेचा आवाज असल्याचा दावा करतात.एनडीएचा संख्याबळाचा वरचष्मा सुदर्शन रेड्डींना मान्य असला तरी, तो फारसा मोठा नसल्याचेही त्यांनी सांगितले.त्यांच्या म्हणण्यानुसार, उपराष्ट्रपती पद हे केवळ राजकीय पद नसून, एक उच्च संवैधानिक पद आहे. ही निवडणूक केवळ आकड्यांवर न ठरता, अंतरात्म्याच्या निर्णयावर आधारित असते.जर काही छोटे पक्ष किंवा स्वतंत्र खासदार भूमिका बदलले, तर निकाल पूर्णतः बदलू शकतो.
सद्यस्थितीत ३२ मतांचा फरक आहे. जर या मतांमध्ये ३६ ते ३८ मतांचे ‘स्विंग’ झाले, तर निकाल धक्कादायक ठरू शकतो.
अशा स्थितीत, एनडीएसाठी ही निवडणूक अत्यंत धोक्याची ठरू शकते.एनडीए प्रत्येक निवडणुकीत आपला प्रतिस्पर्धी कमी लेखत नाही, मात्र २०२४ मध्ये त्यांनी विरोधकांनाही आणि संघालाही दुर्लक्षित केले आणि त्याचा फटका त्यांना जागांवर बसला.जर एनडीएचा उमेदवार पराभूत झाला, तर तो केंद्र सरकारच्या बहुमतावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो.आणि जर सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले, तर तो मागील उपराष्ट्रपती जगदीप धनखड पेक्षा अधिक प्रभावशाली आणि निर्णयक्षम ठरू शकतो.जे सरकारच्या पक्षात असतील.
सी. पी. राधाकृष्णन यांच्या निर्णयक्षमतेचा एक उदाहरण हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या प्रकरणात दिसून आला होता.
न्यायालयाने हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध काहीही आढळले नाही असे स्पष्ट सांगितल्यावरही, राधाकृष्णन यांनी त्यांना राजभवनात बोलावून अटक करायला लावले.
यानंतर त्यांना झारखंडच्या राज्यपालपदावरून पदोन्नती देत महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले.उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे राजकीय तापमान वाढत आहे.या निवडणुकीत कोण, केव्हा, काय निर्णय घेईल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे साऱ्या राजकीय समीकरणांवर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
