नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड ते अहमदपुर जाणाऱ्या एका बसमध्ये एका महिलेच्या बॅगमधील 22 हजार 90 रुपयांचे मणीमंगळसुत्र चोरट्यांनी चोरले आहे.
मैनाबाई दिगंबर कांबळे (55) रा.सावरगाव पीर ता.मुखेड या महिला 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुखेड बसस्थानकातून मुखेड ते अहमदपुर जाणाऱ्या बसमध्ये प्रवासाकरण्यासाठी बसल्या. त्यांच्या बॅगमध्ये त्यांचे सोन्याचे मनीमंगळसुत्र ठेवले होते. ते कोणी तरी चोरट्यांनी चोरले. ते 22 हजार 90 रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. ही घटना मुखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 198/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार गोंटे अधिक तपास करीत आहेत.
बसमध्ये महिलेचे मणीमंगळसुत्र चोरले
