“बाहेरून मतदार आणा, निवडणूक जिंका!” — लोकशाहीच्या नावावर उघडपणे गालबोट?

‘बाहेरचे मतदार’ आणि ‘शून्य पत्ते’: मतदारसंघांचा बनावट कारभार उघड   

‘द हिंदू’ या नामांकित वर्तमानपत्रात भारतीय जनता पक्षाचे केरळ राज्याचे उपाध्यक्ष गोपाळकृष्णन यांनी दिलेलं एक महत्त्वाचं वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यांनी सांगितलं की, केरळमधील त्रिशूर या लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या सन 2024 च्या निवडणुकीत वाढवण्यात आली होती. त्यांच्या या वक्तव्यातून असं सूचित होतं की निवडणूक जिंकण्यासाठी बाहेरून मतदार आणले जातात.

गोपाळकृष्णन पुढे म्हणाले की, “आम्हाला वाटलं, तर आम्ही जम्मू-काश्मीरमधूनही मतदार आणू शकतो.” हे वक्तव्य केरळमधील असलं तरी त्याचा धक्का दिल्लीतील निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दिल्लीतील त्या गल्लीबोळांमध्ये खळबळ उडाली आहे, जिथून भारताचं राजकारण चालवलं जातं.गोपाळकृष्णन सांगतात की, “जम्मू-काश्मीरमधून लोक आणल्यानंतर त्यांना एखादं वर्ष त्या मतदारसंघात वास्तव्य करायला लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांच्या नावाची मतदार यादीत नोंद होते.” त्यांच्या मते, हा बनावट मतदानाचा प्रकार नाही. ते स्पष्ट करतात की, त्यांना विधानसभा मतदारसंघांमध्ये असं करायचं नव्हतं, परंतु लोकसभा निवडणुकीत हे करण्यात आलं.

ते असंही म्हणतात की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये या वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर पुनर्विचार केला जाईल. मात्र, मृत व्यक्तीच्या नावावर मतदान करणं किंवा एकाच व्यक्तीने दोन वेळा मतदान करणं हे खोटारडेपणाचं लक्षण आहे, असं ते मानतात.गोपाळकृष्णन स्पष्टपणे म्हणतात की, “कोणत्याही पत्त्यावर मतदार नोंदवता येतो आणि आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदवणार आहोत. यात काहीच संशय नाही.”

सुरेश गोपी यांचा विजय 74,682 मतांनी झाला होता. गोपाळकृष्णन सांगतात की, काँग्रेसला 2019 मध्ये 4,16,000 मते मिळाली होती, परंतु 2024 मध्ये ती संख्या कमी होऊन 3,27,000 वर आली. ते विचारतात, “मग उर्वरित 90,000 मते कुठे गेली?” त्यांचे म्हणणे आहे की, भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी यूडीएफ आणि एलडीएफ या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र येऊन लढा दिला.या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 72% झाली होती. 10 लाख 81 हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर मतदारांची एकूण संख्या 14 लाख 83 हजार होती.

त्रिशूर लोकसभा मतदारसंघाबद्दल असं म्हटलं जातं की, ज्यानं एकदा ही निवडणूक जिंकली त्याची पुन्हा निवड होईलच याची खात्री नसते. गोपाळकृष्णन सांगतात की, बाहेरून लोक आणून एका वर्षासाठी वास्तव्य करून त्यांना मतदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो. हाच मुद्दा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मांडला होता.एक उदाहरण देताना ते म्हणतात की, “दिल्लीतील एखादी व्यक्ती त्रिशूरमध्ये येते, घर भाड्याने घेते, काही दिवस वास्तव्य करते आणि परत दिल्लीला जाते. नंतर निवडणुकीच्या वेळेस मतदार यादीत नाव नोंदवून मतदान करते. खरं तर केरळशी त्या दिल्लीच्या व्यक्तीचं काहीही संबंध नाही.”

त्यांचं मत आहे की, एक माणूस दोन ठिकाणी मतदान करत असेल, तर तो खोटारडेपणा आहे, पण बाकी प्रकार बरोबर आहेत. ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे, ते 10-15 हजार मतदार इकडून तिकडे सहज हलवू शकतात. हीच आपल्या लोकशाहीची विदारक स्थिती आहे.बिहारमध्ये सध्या असा आरोप होतोय की, काही 30 ते 40 लाख मतदार वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये मतदान करत असतात. हा प्रकार कायदेशीर आहे का?एका घराच्या पत्त्यावर जर 80 लोकांची मतदार नोंदणी असेल, तर ते कायदेशीर म्हणता येईल का? एका खोलीत 80 मतदारांची नोंदणी, ‘शून्य’ नावाचा पत्ता – हे सर्व पाहण्यात आलं आहे.

जनता विचारत आहे की,, “जर 142 कोटी लोकांकडे आधार कार्ड आहेत, तर कोणाच्या आधार कार्डावर ‘शून्य’ पत्ता असू शकतो का?” निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सांगतात की अनेक मतदारांच्या पत्त्यावर ‘शून्य’ नमूद आहे,ही बाब हास्यास्पद वाटत नाही का?जर मतदानासाठी शून्य, डबल शून्य, पाच शून्यसारखे पत्ते वैध मानले जात असतील, तर मग भारतीय नागरिकत्वासाठीसुद्धा हेच पत्ते वापरण्यात यावेत, असा उपरोधिक प्रश्न उपस्थित होतो.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 2024 मध्ये प्रथमच त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आला. जर तो केवळ बाहेरून आणलेल्या मतदारांमुळे निवडून आला असेल, तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे. मग अशा खासदाराला त्या मतदारसंघातील जनतेचा प्रतिनिधी म्हणावं का?महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटलांचे साम्राज्य आहे. त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यात 18 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. विधानसभेच्या निवडणुकीत हे सर्व विद्यार्थी मतदार झाले होते. म्हणजे हीच का निवडणूक जिंकण्याची पद्धत?आता असं चित्र दिसतंय की, राहुल गांधी यांनी जेव्हा निवडणूक गैरप्रकारांबद्दल पत्रकार परिषदेत सांगितलं, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते ते गैरप्रकार नसून कायदेशीर आहेत, असं ठसवण्याचा प्रयत्न करू लागले.गोपाळकृष्णन, जे स्वतः भाजपचे उपाध्यक्ष आहेत, स्पष्टपणे सांगतात – “बाहेरून मतदार आणून निवडणूक जिंकणं हे गैरकृत्य नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!