नांदेड– दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य या साहित्य संस्थेची मासिक बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठक ही साहित्य मंडळाचे सदानंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत प्रथम जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मरणपावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अक्षरोदय साहित्य मंडळ कडून दर वर्षी घेण्यात येणाऱ्या कविता पावसांच्या हा कार्यक्रम या ही वर्षी घेण्यात येणार आहे. पण यात या वर्षी जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे हा कार्यक्रम पुरामुळे मरणपावलेल्यां नांदेड मधील नागरिक यांच्या आठवणीत घेण्यात येणार आहे असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. बैठकीत अनेक विषय घेण्यात आले. कविसंमेलन, पुरस्कार वितरण, आणि आगामी कार्यक्रम बद्दल चर्चा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील पावसाळी परिस्थिती पाहता मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी शोक व्यक्त केला. आणि नांदेड प्रशासन यांचे या वेळी आभार मानण्यात आले त्यांनी खूप जोखमीने या परिस्थितीत कार्य करून अनेकांचे प्राण वाचवले आहे. या बद्दल जिल्हाधिकारी साहेब यांचे ही आभार मानण्यात आले. लागलीच या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत मंडळाचे पदाधिकारी चंद्रकांत चव्हाण, आविष्कार शिंदे, पंकज कांबळे, सुयोग भगत, अजित मुनेश्वर, इंदुबाई सपकाळे, आशा सपकाळे, हे हजर होते. सदर बैठक ही अक्षरोदय सदन, आठवले कॉम्प्लेक्स, सहयोग नगर, नांदेड या ठिकाणी संपन्न झाली. बैठकीचे आभार पंकज कांबळे यांनी मानले.
अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य कडून नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मरणपावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण
