नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी यांना ऍक्सीस बॅंक अनेक सुविधा देत आहे. या संदर्भाचे पत्र पोलीस महासंचालकांच्या मंजुरीनंतर प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी राज्यभरातील पोलीस घटक प्रमुखांना पाठविले आहे.
डिसेंबर 2024 मध्ये ऍक्सीस बॅंकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष यांच्यासोबत पोलीस विभागाने सामंज्यस्य करार (एमओयु) तयार केला आहे. त्या एमओयुप्रमाणे पोलीस दलातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी यांना पोलीस सॅलेरी पॅकेज (पीएसपी) अंतर्गत ऍक्सीस बॅंक मोठ्या सुविधा देणार आहे. पुर्वी सुध्दा या सुविधा होत्या. परंतू आता त्याच्यात वाढ करण्यात आली आहे.
पोलीस विभागाला मिळणाऱ्या सुविधांमध्ये एखाद्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यास 1.2 कोटी रुपये मिळतील. कायमचे अपंगत्व आल्यास 1.1 कोटी रुपये मिळतील. अंशत: अपंगत्वाच्या बाबतीत 1.1 कोटीच्या 75 टक्केपर्यंत सुविधा देण्यात येतील. ऍक्सीस बॅंक पोलीस विभाागासाठी नैसर्गिक मृत्यू संरक्षण 10 लाख रुपये देत आहे. मुलांच्या विवाहासाठी 10 लाख रुपये, दोन मुली असतील तर प्रत्येकी 5 लाख रुपये. दोन मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 8 लाख रुपये असे 16 लाख रुपये. हवाई अपघात संरक्षणसाठी 1 कोटी रुपये. संयुक्त खातेदारास वैयक्तीक अपघात संरक्षण 15 लाख रुपये. के्रडीट/ डेबीट कार्डचे इतर सर्व नियमित फायदे. दहशतवादी हल्यात मृत्यू झाला तर 10 लाख रुपये.
विशेष पोलीस महानिरिक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी हे पत्र राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना पाठविले असून जास्तीत जास्त पोलीसांनी ऍक्सीस बॅंकेत आपले वेतन खाते उघडावे असे सुचित केले आहे.
पोलीसांनी आपले वेतन खाते ऍक्सीस बॅंकेत उघडावे; भरपुर सुविधा
