नांदेड(प्रतिनिधी)-गणेशोत्सव लक्षात घेता सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे वेतन 26 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जारी केले आहे.
दि.27 ऑगस्ट पासून यंदाचा गणेशोत्सव समारंभ सुरू होणार आहे. या परिस्थितीत राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना गणेशोत्सव साजरा करतांना अडचणी येवू नयेत म्हणून 1 सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे मासिक वेतन, निवृत्ती वेतन आणि कुटूंब निवृत्ती वेतन, गणेशोत्सवाच्या पुर्वी अर्थात 26 ऑगस्ट 2025 रोजी प्रदान करण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशावर वित्त विभागाचे उपसचिव डॉ.राजेंद्र गाडेकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. शासनाने आपला हा निर्णय संकेतांक 202508211653016505 प्रमाणे आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
सप्टेंबर वेतन 26 ऑगस्ट रोजीच मिळणार
