वस्तीगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वस्तीगृहातील मुलाच्या मृत्यू प्रकरणी वस्तीगृहातील मदतनीस आणि वस्तीगृह अधिक्षक या दोघांविरुध्द मृत्यूस कारणीभुत या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्र्वर आत्माराम वडगावे रा.कुंचेली ता.नायगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 ऑगस्ट रोजी दुपारी मिलिंद विद्यार्थी वस्तीगृह तरोडा नाका नांदेड येथे त्यांचा मुलगा तुळशीराम ज्ञानेश्र्वर वडगावे (11) याचा मृत्यू झाला. तक्रारीप्रमाणे वस्तीगृहातील मदतनिस राहुल शिवाजी सोनटक्के आणि वस्तीगृह अधिक्षक सुरज ढवळे यांनी संगणमत करून मुलास ताप आला असतांना आणि उलट्या होत असतांना त्यास दवाखान्यात देवून उपचार देण्यासाठी हलगर्जीपणा केला असल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला आहे. भाग्यनगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 464/2025 दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सवराते हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!