नांदेड(प्रतिनिधी)-एका चार चाकी गाडीमध्ये तिन गोवंश जातीचे बैल कु्ररतेने कोंबून चोरटी विक्री करण्यासाठी जात असतांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही गाडी पकडली आहे.
पोलीस अंमलदार संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता धनेगाव पेट्रोल पंपासमोरून एम.एच.26 बी.ई.5037 ही गाडी जात असतांना तपासणी केली तेंव्हा त्यात तिन बैल अत्यंत कु्ररतेने कोंबलेले होते आणि ते चोरटी विक्री करण्यासाठी घेवून जात होते. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी आडगाव ता.लोहा येथील सलीम चॉंद पाशा शेख (34) विरुध्द गुन्हा क्रमांक 800/2025 दाखल केलेला आहे. पोलीस अंमलदार यालावार अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणात 3 लाखांची गाडी आणि 1 लाख 40 हजार रुपयांचे बैल जप्त करण्यात आले आहेत.
चोरटी बैल वाहतुक करणारी गाडी पकडली
