नांदेड– कंधार तालुक्यातील मौजे कोटबाजार गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पती-पत्नीचा अंगावर भिंत कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली शेख नासेर माजी ग्रामपंचायत सदस्य तर शेख हसीना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य घरकुल मंजूर पण पहिला हप्ता न मिळाल्याने घराचे बांधकाम रखडले होते.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कच्च्या मातीची भिंती कमकुवत झाल्यामुळे ही घटना घडली असून, रात्री शेख नासेर शेख आमीन व त्यांच्या पत्नी शेख हसीना शेख नासेर झोपलेले असताना अंगावर भिंत पडून या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख नासेर कोटबाजार ग्रामपंचायत माजी सदस्य होते तर त्यांच्या पत्नी शेख हसीना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होत्या, मात्र भिंत कोसळून झालेल्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्यांना घरकुल मंजूर झाले होते मात्र त्यांना पहिला हप्ता मिळाला नाही त्यातच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते घराचे काम सुरू करू शिकले नाही त्यातच हे दुर्दैवी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
