नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे 12 ऑगस्ट रोजी सापडलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीच्या प्रेतासंदर्भाने आकस्मात मृत्यूच्या तपासानंतर आता खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
12 ऑगस्ट रोजी बाबाराव बालाजी मेथे (28) यांचे प्रेत मुखेडमध्ये सापडले होते. ते चांदळी ता.मुखेड येथे बाजार करण्यासाठी आले होते. या संदर्भाने आकस्मात मृत्यू क्रमांक 55/2025 दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या तपासात बालाजी वर्धमान भालेराव रा.कुद्राळा ता.मुखेड यांच्यासोबत बाबाराव मेथे दारु पित होते. आणि दारु पितेवेळेस झालेल्या भांडणातून बालाजी भालेरावने बाबाराव मेथेच्या डोक्यात व तोंंडावर दगडाने ठेचून त्यांचा खून केला आहे. या बाबतची तक्रार दादाराव बालाजी मेथे यांनी दिल्यानंतर मुखेड पोलीसांनी खून या सदरात 191/2025 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
मुखेडमध्ये खून
