नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खचलेल्या पोलीस इमारतीमध्ये श्रीनगर येथील जायकवाडी इमारतीसमोरचा गॅलरीचा भाग कोसळला आहे. या गॅलरीखाली दुकानेपण आहे. पण सुदैवाने हानी जास्त झाली नाही.
स्नेहनगर भागात पोलीसांच्या इमारती आहेत. या इमारती 1997-98 मध्ये बनलेल्या आहेत. त्यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण हे होते. त्यांनी या इमारतींना वेगवेळ्या धरणांची नावे दिलेली आहेत. त्यातील एका इमारतीचे नाव जायकवाडी असे आहे. मागील काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे अनेक खचलेल्या इमारतींना धोका होताच. श्रीनगरमध्ये असलेल्या या इमारतींना बनवून आतापर्यंत 27 वर्ष झालेली आहेत. परंतू त्यांच्या देखरेखीकडे लक्ष नसल्यामुळे या इमारतीमध्ये पाण्याचा निचरा होवून त्या अजून खचत गेल्या आणि आज सकाळी जायकवाडी या इमारतीमधील गॅलरीचा भाग कोसळला आहे. या गॅलरीखाली दुकाने पण आहेत. परंतू हाणी जास्त न झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वृत्तलिहिपर्यंत या पडलेल्या भागाचा कचरा उचलल्या जात असून तेथे झाका झाकी सुरू आहे.

