नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूवर छापा टाकला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन ठिकाणी धाड टाकून 42 लाख 45 हजार रुपयांचा अवैध वाळूतील साहित्याचा जप्ती प्रकार आज मध्यरात्रीनंतर घडविला आहे. यामध्ये काही जण नदीतून दुसऱ्या किनाऱ्यावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. तरी या संदर्भाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. नांदेड ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.13 ऑगस्टच्या मध्यरात्री 12.30 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी शिवारातील आणि हस्सापूर रस्त्यावरील गोदावरी नदीकाठी छापा टाकला तेंव्हा तेथे जमा केलेली अवैध 15 ब्रास वाळू 75 हजार रुपये किंमतीची तीन तराफे दीड लाख रुपये किंमतीचे आणि एक गाडी एम.एच.26 बी.ई.4303 जिची किंमत 40 लाख रुपये असा 42 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये हिराचंद संभाजी भोकरे (41) रा.असर्जन आणि एक अज्ञात माणूस अशा दोघांना आरोपी करण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार पचलिंग, मुंडे, कल्याणकर, मेकलवाड, केंद्रे, डफडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!