नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 30 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हदगाव शहरातील भाग्यनगर भागात दोन जणांनी दोन घरात चोऱ्या केल्या आहेत. नांदेड शहरातील एस.टी.प्रवासादरम्यान एका महिलेचे 1 लाख रुपये किंमतीचे दागिणे चोरीला गेले आहेत.
किनवट येथील सौ.वर्षा ज्ञानेश्र्वर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 10 ऑगस्ट रोजीच्या सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान त्या आपल्या भावाकडे गेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम 50 हजार आणि घरातील 80 हजार 60 रुपये सोन्याचे दागिणे असा एकूण 1 लाख 30 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 556/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार वाढगुरे अधिक तपास करीत आहेत.
प्रभाकर रुक्माजी धुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 ऑगस्टच्या दुपारी 12 वाजेच्यासुमारास रवि लोशा संगेवाड व अर्जुन संगेवाड दोघे रा.नंदीनगर ता.भोकर यांनी त्यांच्या घरातील 22 हजार रुपये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे 80 हजार 60 रुपयांचे आणि परमेश्र्वर चव्हाण यांच्या घरातील रोख रक्कम 10 हजार आणि चांदीचे दागिणे 3 हजार 500 रुपयांचे असा दोन घरातील 1 लाख 33 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हदगाव पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 285/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक नंद अधिक तपास करीत आहेत.
सौ.यशोदा विष्णु कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 ऑगस्टच्या दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान त्या आणि त्यांचे पती महागाव-नांदेड या एसटी बसने सांगवी पुलाजवळ उतरले. त्यावेळी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे कोणी तरी चोरट्यांनी चोरले आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 309 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार चाऊस अधिक तपास करीत आहेत.
