प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयााकडे न्यायालय बदलून देण्याची विनंती

नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयात हजर असलेल्या पक्षकाराची गैरहजेरी नोंदवून त्या प्रकरणात पुढील तारीख दिल्यानंतर प्रकरणातील हजर असलेल्या पक्षकाराने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांच्याकडे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाबद्दल तक्रार अर्ज केला आहे.
नासेर अलीखान जब्बार अली खान पठाण यांचा न्यायालयात दिवाणी वाद क्रमांक आरसीएस 76/2017 सुरू आहे. दि.8 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची तारीख होती. या प्रकरणात गैरअर्जदार असलेले पक्षकार नासेर अली खान पठाण आणि त्यांचे वकील ऍड. शेख महेमुद हे उपस्थित होते. या प्रकरणात सुनावणीसाठी या प्रकरणातील मुळ अर्जदार क्रमांक 1 ला न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश असतांना 1 वर्षापासून ते हजर झाले नाहीत.
8 ऑगस्टच्या दिवशी मी आणि माझे वकील हजर असतांना न्यायालयाने रोजनामामध्ये दोन्ही बाजूचे वकील अनुउपस्थित असे लिहुन पुढील सुनावणीची तारीख 10 नोव्हेंबर 2025 निश्चित केली आहे. यासंदर्भाने नासेर अली खान पठाण यांचे म्हणणे आहे की, न्यायालयात सीसीटीव्ही आहेत. आम्ही त्या दिवशी हजर होतो. याची सत्यस्थिती चौकशी करून माहिती घ्यावी आणि माझा खटला आरसीएस क्रमांक 76/2017 दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग करावा. या अर्जासोबत त्यांनी 8 ऑगस्ट 2025 चे ऑनलाईन रोजनामा पत्र सुध्दा जोडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!