नांदेड – नांदेड जिल्ह्यात नुकतीच एक विशेष आध्यात्मिक समाजप्रबोधन मोहीम राबवण्यात आली असून यामध्ये “ज्ञान गंगा” व “जगण्याचा मार्ग” या दोन महत्त्वपूर्ण आध्यात्मिक पुस्तकांचा समावेश होता. या ग्रंथांच्या माध्यमातून लोकांना ब्रह्मांडाची उत्पत्ती, जीवात्म्यांचे अस्तित्व, मानव जीवनाचा उद्देश आणि मृत्यूनंतरचा मार्ग या गंभीर विषयांवर सखोल माहिती दिली गेली.
या पुस्तकांतून स्पष्ट केले गेले आहे की, मानव हा केवळ शारीरिक अस्तित्व नाही, तर त्याच्या जीवनामागे एक उच्च आध्यात्मिक कारण आहे. समाजातील सुशिक्षित नागरिकांनी या माहितीचा विचारपूर्वक अभ्यास केला व त्यातून सत्य काय आहे याची जाणीव त्यांना झाली. यामध्ये सांगितले गेले आहे की, जात-पात, अंधश्रद्धा किंवा पाखंडी पूजा यांचा धर्माशी काहीही संबंध नाही. खरी पूजा म्हणजे शास्त्राधारित साधना असून ती मानवजातीच्या उत्थानासाठी अत्यंत आवश्यक आहे.
या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना खरी अध्यात्मिक दिशा मिळाली असून, त्यांच्या जीवनातील अनेक संभ्रम दूर झाले. समाजात समता, बंधुता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश पोहोचवण्याचे कार्य या मोहिमेच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडले आहे.
