14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण

नांदेड(प्रतिनिधी)-सोमवार ते गुरूवार हे चार दिवस नांदेड जिल्ह्यासाठी कोणती तरी आनंदी बातमी देणार आहेत असे प्रसारण लिंबगावचे माजी सहाय्यक पोलीस निरिक्षक करत आहेत. त्यांच्या प्रसारणाची बातमी अशी आहे की, 15 ऑगस्ट अगोदर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांची बदली होणार आहे. आहे ना गम्मत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्रालय जे काम करते ते लिंबगावच्या माजी सहाय्यक पोलीस निरिक्षकांना अगोदरच माहित आहे. लिंबगावचे दुसरे माजी सहाय्यक पोलीस निरिक्षक तर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आणण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे असे ते सांगतात.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूच्या कामकाजामध्ये घडबड केल्याप्रकरणी एक पोलीस उपनिरिक्षक तिन पोलीस अंमलदार यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ बोधनकर यांची चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नियंत्रण कक्षात बोलविण्यात आले आणि त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरिक्षक झुंझारे यांना नियुक्ती मिळाली.
मागील तीन-चार दिवसांपासून बोधनकर लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेकांना दुरध्वनीवरून संपर्क साधून हे सांगत आहेत की, अरे काही घाबरायचे कारण नाही. 15 ऑगस्टच्या अगोदर शहाजी उमाप यांची बदली होणार आहे आणि पोलीस अधिक्षक हे माझ्यावर खुप प्रेम ठेवतात त्यामुळे मी परत येणार आहे. आता आम्हाला प्रश्न असा पडला की, जे काम महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्रालय करते. ते काम करण्याअगोदर ही माहिती पंढरीनाथ बोधनकर यांना मिळते आणि त्याचे प्रसारण सुध्दा ते दुरुध्वनीवरून करत आहेत.
याच पोलीस ठाण्याचे दुसरे माजी सहाय्यक पोलीस निरिक्षक तर छत्रपती संभाजीनगरमध्ये नोकरी असतांना आठवड्यातील अर्धे दिवस नांदेडमध्येच वावरतात. त्यांचा तर हातखंडा असा आहे की, ते पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक यांच्या सुध्दा बदल्या करून घेवू शकतात म्हणे. परंतू मागे झालेल्या अपर पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये त्यांना एक अपर पोलीस अधिक्षक हिंगोली येथे पाठवायचा होता. परंतू त्या ठिकाणी त्यांना यश आले नाही. होत राहते. प्रत्येक वेळेला आपल्या कामाला यश येईलच असे नसते. तर कधीकधी अपयश सुध्दा येत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!