बारड महामार्ग सुरक्षा पथकाने आपल्या गाडीचा अपघात झाला तरी गोमास घेवून जाणारी गाडी आणि आरोपी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास बारड महामार्ग सुरक्षा पथक येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार वाहनांची तपासणी करत असतांना एक वाहन पळून गेले. त्या वाहनाचा पाठलाग करतांना महामार्ग सुरक्षा पथकाची गाडी एका अरुंद जागी कलंडली आणि चालकासह दोन पोलीस अंमलदार जखमी झाले. तरी पण त्यांनी पळून जाणाऱ्या चार चाकी वाहनाला पकडले. त्यामध्ये गोमास होते.
महामार्ग सुरक्षा पथक बारड येथील पोलीस अंमलदार गजानन पंडीत जिन्नेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 ऑगस्ट रोजी ते आणि त्यांचे सहकारी महामार्गावर चालणाऱ्या गाड्यांची तपासणी करत थांबले असतांना 11 वाजेच्यासुमारास टी.एस.16 ई.पी.6002 या गाडीला थांबले. त्यात तिन जण होते. गाडीतून लाल रंगाचे पाणी गळत असल्याचे दिसल्याने त्यांना गाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्यास सांगितली. परंतू तो भरधाव वेगात गाडी घेवून बारडकडे निघाला. तेंव्हा महामार्गाचे शासकीय वाहन क्रमांक एम.एच.26 आर.526 मध्ये चालक दादाराव श्रीरामे, गजानन जिन्नेवाड, परमेश्र्वर श्रीमंगले असे त्या गाडीचा पाठलाग करू लागले. परंतू तोरणा तांड्याजवळ अरुंद रस्ता असल्याने शासकीय गाडी उलटली आणि त्यात मी अर्थात गजानन जिन्नेवाड मला किरकोळ मार लागला. दादाराव श्रीरामे यांच्या पायाला, बरगड्यांना मुक्का मार लागला. पण परमेश्र्वर श्रीमंगले यांच्या डोक्यास व कानास मार लागून रक्त निघाले आहे. त्यांना झालेली जखम गंभीर आहे.
अशा परिस्थितीत सुध्दा महामार्ग सुरक्षा पथकाने त्यांचा आदेश न पाळता पळून गेलेल्या चार चाकी वाहनाला पकडले आणि त्यात मोहम्मद सुफियान मोहम्मद अफजल रा.परभणी, बिलाल मोहम्मद शमशोद्दीन मोहम्मद या दोघांना पकडून पोलीस ठाणे बारडच्या स्वाधीन केले. यांच्यासोबतचा तिसरा आरोपी वजाहिद हा फरार झाला आहे. या चार चाकी वाहनामध्ये 100 किलो गोमास होते. ज्याची किंमत एफआयआरमध्ये 25 हजार रुपये आहे. बारड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 102/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे हे करणार आहेत. बारड महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कालीदास ढवळे यांनी आपल्या जखमी कर्मचाऱ्यांना उपचार द ेण्याची सोय केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!