नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. हदगाव तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती तयार झाली होती. आज दुपारी 3 वाजेपासून शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून 15 हजार 538 क्ुयसेक्स पाणी विसर्जित होत आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सजगतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जागी तलाव तयार झाले. सखल भागात असलेल्या घरांमध्ये पाणी साचले. हदगाव तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला. पाऊस आज सकाळी 8 वाजेपर्यंत सुरूच होता. नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प 92 टक्के भरला आहे.. सतत पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे आज दुपारी 3 वाजता विष्णुपूरी बंधाराच्या एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून 15 हजार 538 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
प्रशासनाने विष्णुपूरी बंधाराच्या खालच्या भागात राहणाऱ्या सर्व नागरीकांना मालमत्तेचे आणि जिवीताचे नुकसान होवून नये यासाठी सजगतेचा इशारा दिला आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने सुध्दा जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, आपले आणि आपल्या शेजाऱ्यांचे रक्षण करा आणि सुखरुप राहा.
विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला
