नांदेड(प्रतिनिधी)-समस्त शेतकरी बांधव, खरेदी विक्री करणारे व्यापारी आणि कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द कायदेशीर संरक्षण, स्पष्ट शासकीय नियमावली, कुरेशी समाजाला शासकीय स्लॉटरहाऊस, व्यवसायाच्या हक्कासाठी आमच्या मागणीची पुर्तता करावी म्हणून कुरेशी समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलन फक्त नांदेडमध्ये झालेले नाही. तर राज्यभरत जिल्ह्याच्या ठिकाणी झालेले आहे. या आंदोलनात शेकडो लोक सहभागी झालेले होते.
शेतकरी व कुरेशी (खाटीक) समाजाचे लोक अनेक वर्षापासून शेती व पशु उद्योगाचा व्यवसाय करतात. तोच त्यांच्या जीवनाचा स्त्रोत सुध्दा आहे. भारत हा कृषी प्रदान देश असल्यामुळे कृषी व पशु पालन या व्यवसायवर अवलंबून आहे. शेतकरी आणि कुरेशी समाज या व्यवसायामध्ये पिढ्यान पिढ्या काम करत आहेत. ज्यामध्ये जनावरांच्या दुधाचा व्यवसाय, भाकड जनरावरांच्या मास विक्रीचा व्यवसाय सुध्दा आहे.
1976 मध्ये सुध्दा कायदा अस्तित्वात आल्यानंतर गो-हत्या व मासाचा धंदा बंद करण्यात आला होता. पण बैल नर प्रजातीचा मास विक्रीचा धंदा सुरू होता. 2015 मध्ये गोवंश हत्या बंदी कायदा आला आणि बैल नरप्रजातीचे मास विक्री सुध्दा बंद झाली. पण त्यानंतर आमच्यावर अन्याय होत आहे. गौरक्षकांच्या नावावर समाजकंटकांकडून त्रास होत आहे. बऱ्याच जागी मॉबलिंचिंग होत आहे. गौरक्षक नावावर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या गाड्या आडवल्या जातात, खंडणीच मागणी होते. नाही तर गुन्हे दाखल केले जातात. गौरक्षकांनी पोलीसांमार्फत जप्त केलेली गौरक्षणातील जनावरांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. सन 2015 चा गौवंश हत्या बंदी कायदा दुरूस्त करावा. डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रामणपत्र त्वरीत मिळण्यासाठी सोय करावी. अशा अनेक मागण्या आंदोलकांच्या आहेत.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मोहम्म अजीरम कुरेशी, जिल्हाध्यक्ष अब्दुल अजिज कुरेशी, शहराध्यक्ष मोहम्मद खलील कुरेशी, महासचिव मोहम्मद रफीक कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होत. या आंदोलनात शेकडो लोक सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होते.
कुरेशी समाजाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी केले धरणे आंदोलन
