नांदेड (प्रतिनिधी)-गोकुंदा किनवट येथील एक शिक्षक आणि त्यांच्या पत्नी अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातून 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जैतापूर ता.जि.नांदेड येथून चोरट्यांनी एक घरफोडून 65 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर येथे दोन घरफोडून चोरट्यांनी 21 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
गोकुंदा किनवट येथील शिक्षक राहुल हरीशचंद्र कोल्हे हे 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता अंत्यविधीसाठी सावरी या गावात आपल्या पत्नीसह गेले होते. या संधीचा चोरट्यांनी फायदा उचलला. दुपारी 1.30 वाजता राहुल कोल्हे परत आले तेंव्हा त्यांना घरफोडलेले दिसले. तपासणी केली असता घराचा कडीकोंडा कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट चाबीने उघडून सोन्या-चांदीचे दागिणे, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 253/2025 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक झाडे अधिक तपास करीत आहेत.
जैतापूर ता.जि.नांदेड येथील धुराजी संभाजी गोभाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 ऑगस्टच्या रात्री 10.30 ते 8 ऑगस्ट पहाटे 6.30 वाजेदरम्यारन ते घरी नसतांना त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पेटीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे 45 हजार रुपये व 20 हजार रुपये रोख रक्कम असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. लिंबगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 142/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार मोरे अधिक तपास करीत आहेत.
गंगाधर सुभाष सोलादवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 ऑगस्टच्या पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान त्यांचे आणि साक्षीदारांचे घरफोडून चा ेरट्यांनी 21 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 405/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार आनेबोईनवाड अधिक तपास करीत आहेत.
गोकुंदा येथे घरफोडले, जैतापूर येथे घरफोडले, भोकरमध्ये दोन घरफोडले
