नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक लोपामुद्रा अनेराव या टांझानिया देशातील किलीमांजारो हे शिखर सर करण्यासाठी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक अश्र्विनी जगताप, उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार आणि आपल्या सहकाऱ्यांच्या शुभकामना घेवून लोपामुद्रा टांझानियाकडे रवाना झाल्या आहेत.

मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव या गावात शेतकरी कुटूंबात जन्म झालेल्या लोपामुद्रा यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वसंतवाडी, माध्यमिक शिक्षण रोहिपिंपळगाव आणि उच्च माध्यमिक शिक्षण चिकाळा येथे पुर्ण केले. या पुढे त्यांनी आपले पुढचे शिक्षण मुदखेड आणि नायगाव येथे केले. त्यांचे वडील दत्तराव आनेराव यांना खेळाची आवड होती. परंतू त्यांना कोठे स्पर्धेत भाग घेता आला नाही. आपली शेती पडीत ठेवून आपल्या मुलीच्या खेळाला प्राधान्य देत त्यांनी त्यांचा सराव घेतला. 14 व्या वर्षात लोपामुद्रा यांनी सन 2000 मध्ये अखिल भारतीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवून आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव कमावले. खेळायच्या वयात सराव करून राज्यस्तरीय स्पर्धेत 15-20 वेळेस विजेते पद प्राप्त केले. सन 2006 मध्ये त्यांची निवड नांदेड जिल्हा पोलीस दलात झाली. पोलीस स्पर्धेमध्ये सलग दोन वर्ष अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्ण पदक, रौप्यपदक मिळवून आपल्या पोलीस दलाचे नाव राज्यात उभे केले. पोलीस दलात आल्यानंतर त्यांचे लग्न पोलीस असलेल्या सुशिल कुबडे यांच्यासोबत झाले. अखिल भारतीय पोलीस स्पर्धेत नावलौकिक मिळवल्याने त्यांना एक टप्पा पदोन्नती मिळाली. आपले घर, दोन मुले सांभाळात त्यांनी शारिरीक शिक्षण या विषयात विद्यावाचस्पती पुर्ण केले. आफ्रिका खंडाती सर्वात उंच असलेल्या किलीमंाजरो ज्याची उंची 5895 मिटर आहे आणि समुद्र सपाटीपासून 19 हजार 341 फुट उंच आहे. या पर्वताला गवसणी घालण्यासाठी लोपामुद्रा दत्तराव आनेराव, (लोप्रामुद्रा सुशिल कुबडे ) या टाझांनियाकडे रवाना झाल्या आहेत. त्यांच्या यशासाठी वास्तव न्यज लाईव्ह सुध्दा शुभकामना व्यक्त करत आहे.

