शेतकऱ्याच्या घरात 55 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पुर्नरवसीत पेठवडज ता.कंधार या गावात पती-पत्नी शेतात काम करायला गेल्यावर त्यांच्या घरातून चोरट्यांनी 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
अशोक माधवराव मेकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान ते आणि त्यांची पत्नी शेतात कामासाठी गेले असतांना त्या दरम्यान कोणीतरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे व एक मोबाईल असा 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 267/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!