नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
हिंगोली येथील भव्य कावड यात्रा नियोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण केले.
