आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पारदर्शक कामे करा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  •   महसूल सप्ताहाचे नांदेड तहसील कार्यालयात उद्घाटन

 नांदेड – बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागातील कामे अधिकाधिक लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.  महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाचे उद्घाटन नांदेड तहसिल कार्यालयात आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड यांच्यासह नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक, तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल दिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड तहसील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. महसूल कायदे, नियम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अपडेट राहावे असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. महसूल दिनानिमित्त त्यांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. समाजाचे हित लक्षात घेऊन महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावीत असे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते अल्पभूधारक प्रमाणपत्र ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, मिळकत प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात  वितरण करण्यात आले. 27 बिडी कामगारांना राशनकार्डचेही यावेळी वितरण करण्यात आले. शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा अभियानांतर्गत नांदेड तहसीलचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!