“त्या’ युवतीला पळवितांना खंडीभर डोळे पाहत होते पण त्यांनी काही केले नाही

नांदेड(प्रतिनिधी)- शहरात काल सायंकाळी  च्यासुमारास एका युवतीला दोन जणांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला. एक जण त्याचा व्हिडीओ बनवित होता आणि एक जण थोडी हिम्मत दाखवत होता. परंतू त्याला मदत मिळाली नाही आणि ते दोघे त्या युवती/ बालिकेला बळजबरीने रेल्वे स्थानक परिसरातून ओढून, रस्त्यावर आणून, दुचाकीवर बळजबरीने पोते नेतात तसे बसवून घेवून गेले. या समाजाचे दुर्भाग्य किती आहे पाहा की, हजारो लोकांच्या समक्ष हे अपहरण होत आहे. परंतू कोणीच काही मदत करत नाही. याही पुढे याचा ईतिहास अजून वेगळा असेल तरी पण समाजासमोर एका युवतीला जबरदस्तीने पळवून नेतांना समाजाने आपले डोळे झाकावे आणि आरोप पोलीसंावर करावा हे किती योग्य आहे.
काल सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास एक युवक एका युवतीला/बालिकेला रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ओढत असतांनाचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम आणि अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी काही तासातच त्या युवती/ बालिकेला पळवून नेणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाचे नाव मोहम्मद खाजा मोहम्मद अयान असे आहे. तो इकबालनगर येथील राहणारा आहे.त्याचा साथीदार हा अल्पवयीन बालक आहे. त्यांनी ज्या दुचाकीवर युवतीला पळवून नेले ते दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.व्ही.0928 वजिराबाद पोलीसांनी जप्त केली आहे.
घटनाक्रम घडला, आरोपी पकडले आणि आरोपींचा उद्देश शोधायचा आहे.महिलेला नेण्याचा उद्देश एकच असू शकतो. हा प्रकार एका व्यक्तीने व्हिडीओ बनविला. एक जण मदत करण्याच्या तयारीत होता. पण बहुदा तो एकटा असल्याने त्याला यश आले नाही. आमच्या लेखणीचा उद्देश असा आहे की, शेकडो डोळे हा प्रकार पाहत होते. त्या शेकडो मधील काही खंडीभर डोळ्यांना जरी याची जाण झाली असती तर हा प्रकार तेथल्या तेथेच थांबला असता. काही दिवसांपुर्वीच सातारा जिल्ह्यात एका इमारतीत एका युवतीच्या गळ्याला चाकू लावून एक युवक तिला घेवून जाण्याच्या प्रयत्नात असतांना काही जणांनी त्याला बोलण्यात लावले. दुसरीकडे त्या युवकाच्या पाठीमागील भिंतीवरून चढून एक युवक खाली आला आणि दबल्या पायाने त्यांच्यामागे पोहचला आणि त्या युवकाच्या चाकूचा हात त्याने पकडताच तेथे जमलेले अनेक जण त्या युवकाच्या अंगावर पडले आणि युवतीला वाचविले. सर्वसामान्य पणे जसे होते. त्या प्रमाणे त्या सुरा धारक युवकाला तेथील लोकांनी प्रसाद पण दिला.
असा प्रकार नांदेडमध्ये का घडला नाही असे आम्हाला वाटते. कोणताही चोर, दरोडेखोर, अवैध काम करणारा व्यक्ती हा अगोदरच भित असतो. कोणत्या तरी नशेत तो हिम्मत दाखवतो आणि त्या हिम्मतीला तोडण्याचे काम जनतेने पण करायला हवे. नेहमीच पोलीसांना दोष देवून काही अर्थ नाही. आज या प्रकरणाच्या बातम्या छापून आल्या. त्यामध्ये मागील दीड वर्षापुर्वी पण असे घडले होते असे छापले आहे. पोलीसांनी जास्त लक्ष देण्याची गरज नाही. खरे तर सरकारला सांगायला हवे की, पोलीसांची जी मुळ मंजुर संख्या आहे ती प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात यावी. ती दिल्यानंतर सुध्दा ती कमीच पडणार आहे कारण आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे. हे सर्व लिहित असतांना एक नक्की की, या प्रकरणात ज्यांच्या समोर हा प्रकार घडला त्यांनी आपले डोळे का बंद करून घेतले. उद्या तुमच्या घरात असा काही प्रकार घडला, तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत असे काही घडले तरी सुध्दा तुम्ही पोलीसांनाच सांगणार आहात का? तुम्ही स्वत: काही करणार नाहीत काय? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.

संबंधित व्हिडिओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!