नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एमएसईबी कार्यालय बाऱ्हाळी येथे चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्याील संगणक आणि सुट्टे भाग असा 35 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
देगलूर येथील अनिकेत गजानन अमृते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 जुलैच्या रात्री 8 ते 29 जुलैच्या पहाटे 9 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या चिंतामणी सिटी बंधारा रोडवरील घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे 73 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी या तक्रारीप्रमाणे गुन्हा क्रमांक 389/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार तलवारे अधिक तपास करीत आहेत.
मुखेड येथील उपकार्यकारी अभियंता महेश राजन्ना गट्टावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमएससीबी कार्यालय बाऱ्हाळी चौक मुखेड येथे 28 जुलैच्या सायंकाळी 7.30 ते 29 जुलै सकाळी 9.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी कार्यालयाचे मेन गेटचे कुलूप तोडले आणि त्यातील संगणक व सुट्टे भाग 35 हजार 500 रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. मुखेड पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 722/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार जंकुट अधिक तपास करीत आहेत.
देगलूर शहरात घरफोडले; मुखेड शहरात एमएसईबी कार्यालय फोडले
