नांदेड(प्रतिनिधी)-मद्यधुंद चार चाकी वाहन चालकाने भाग्यनगर कॉर्नर येथे अनेक वाहनांना चिरडले. ही गाडी गंगाखेड तालुक्यातील कोण्या तरी राजकीय नेत्याची आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1.15 वाजता एक अजब अपघात घडला. चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.22 ए.एम.5 क्रमांकाच्या गाडीने भाग्यनगर कॉर्नरजवळ उभ्या असलेल्या दोन ऍटो रिक्षा, एक मारोती अल्टो गाडी आणि रॉयल इंफील्ड दुचाकी व इतर काही दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात बुलेट चालक व एका ऍटो रिक्षा चालकाची गंभीर अवस्थाआहे. भाग्यनगर पोलीसांनी सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे उभ्या वाहनांना धड दिली. यात अनेक जण थोडक्यात बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्व जखमींना रुग्णालयात पाठविले आहे. गाडी चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. पण खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक हा नांदेडचा रहिवासी आहे. ही गाडी क्रमांक 5 ही गंगाखेड तालुक्यातील कोणत्या तरी मोठ्या नेत्याची आहे.
मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना उडवले
