नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी दोन आरोपींकडून 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. त्यातील तीन गाड्या तेलंगणा राज्यातून चोरून आणलेल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी 29 जुलै 2025 रोजी आसना ओव्हर ब्रिज जवळ सय्यद फेरोज सय्यद मुजीब (24) रा.मिलत्तनगर नांदेड आणि उमर मोहम्मद अरबाज अब्दुल वाहाब बागवान (20) रा.मिलत्तनगर नांदेड या दोघांना पकडले. कौशल्यपुर्ण तपास करून यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, नांदेडमधील इतवारा पोलीस ठाणे, तेलंगणा राज्यातील पोलीस ठाणे बोधन, पोलीस ठाणे मेडचलन, पोलीस ठाणे देवरुपला या हद्दीत झालेल्या पाच दुचाकी त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. ज्यांची किंमत 2 लाख 20 हजार रुपये आहे. हे सर्व मपद्देमाल आणि दोन आरोपी विमानतळ पोलीसांनी नंादेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे, पोलीस अंमलदार शेख जावेद, बालाजी पांचाळ, शेख सोहेब, राजेश माने, पाकलवाड, नंदगावे यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
विमानतळ पोलीसांनी नांदेड शहरातील दोन आणि तेलंगणा राज्यातील तीन अशा पाच दुचाकी जप्त केल्या
