भारत गौरव रेल्वे यात्रेत पाच ज्योर्तिलिंगांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आणि दीक्षाभुमी दर्शन घेण्याची सोय

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय गौरव रेल्वे गाडी 16 ऑगस्ट रोजी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनमधून सुरू होणार आहे. यात 8 रात्री आणि 9 दिवस असा प्रवास आहे. या प्रवासात पाच ज्योर्तिलिंगांचे दर्शन होणार आहे. सोबतच विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दिक्षाभुमी आणि जन्मभुमी देखील पाहता येणार आहे.
इंडियन रेल्वे कॅटरींग ऍन्ड टुरिझम कार्पोरेशनच्यावतीने जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटप्रमाणे भारतातील पाच ज्योर्तिलिंग महाकालेश्र्वर, ओंकारेश्र्वर, त्र्यंबकेश्र्वर, भिमाशंकर, घृष्णेश्र्वर या ठिकाणी आणि सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दिक्षाभुमी नागपूर, जन्मभुमी महु येथे दर्शन करण्यासाठी जाता येणार आहे.
भारत गौरव स्पेशल रेल्वे दुपारी 2 वाजता सिकंदराबाद रेल्वे स्थानकातून निघले. ही गाडी सिकंदराबाद, कामारेड्डी, धर्माबाद, नांदेड, पुर्णा मार्गे उज्जेनला पोहचेल. या रेल्वेमध्ये दिवसभरात तिनवेळेस जेवन दिले जाईल. प्रत्येक कोचमध्ये रेल्वेचा कर्मचारी उपलब्ध असेल. या रेल्वे गाडीमध्ये दक्षीणमध्ये रेल्वे विभागाचे पर्यटन सहाय्यक व्यवस्थापक देखील उपस्थितीत राहतील. या रेल्वेमध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी 14 हजार 700 रुपये साध्या कोचमध्ये, तृतीय श्रेणी वातानुकुलीत कक्षमध्ये 22 हजार 900 आणि द्वितीय श्रेणी वातानुकूलीत कोचमध्ये 29 हजार 900 रुपये असा दर आहे. या सोयीचा नांदेड, परभणी या जिल्ह्यातील लोकांनी उपयोग घ्यावा असे दक्षीणमध्ये रेल्वेने सांगितले आहे. अधिक माहितीसाठी  www.irctctourism.com या संकेतस्थळावर भेट द्या. किंवा मोबाईल क्रमंाक 9701360701,9281030726, 9281030744, 92281030734 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!