नांदेड(प्रतिनिधी)-नागपूरी काकाचे सुपूत्र अभिषेक यांनी एक मुलाखत घेतांना एक संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षांना केंद्रीय मंत्री असे म्हटले. तेथे चुक झाली हेही ठिक आहे. मात्र वृत्तवाहिनींच्या प्रमुखांनी सुध्दा चुकच केली आणि तशाच पध्दतीने तो व्हिडीओ पुढे आला. अजब आहे ना. मलाच सर्वात जास्त अक्कल आहे म्हणता म्हणता आपलीच अक्कल आपणच दुरडीत टाकलेली दिसते.
काल 27 जुलै रोजी छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे हे नांदेडला आले होते. त्यांची मुलाखत घेतांना एबीपी माझाचे प्रतिनिधी हे सुरूवात करतांना म्हणाले की, छाया संघटनेचे केंद्रीय मंत्री नानासाहेब जावळे हे वज्रमुठ बैठक घेण्यासाठी नांदेडला आले आहेत. ते आपल्या समोर आहेत आणि आता त्यांच्याशी बोलू या. पुढे त्यांनी वज्र मुठ संदर्भाची माहिती घेतली आणि ती बातमी प्रसारीत केली.
नानासाहेब जावळे हे छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. पण त्यांना केंद्रीय मंत्री असा उल्लेख करून पत्रकारीतेत आपला झेंडा सर्वात उंच आहे अशी स्वत:च्या डोक्यावर हंडी घेवून फिरणाऱ्या आभिषेक एकबोटेने त्यांना केंद्रीय मंत्री असे उल्लेखीत केले. दुसऱ्या पिढीतील पत्रकार आहे अभिषेक एकबोटे. त्यांच्याकडून चुक झालीही असेल. पण एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रमुखांनी बातमी प्रसारीत करण्याअगोदर त्यात झालेली चुक शोधलीच नाही. ही बाब अत्यंत दुर्देवी वाटते. एबीपी माझा ही वृत्तवाहिनी आज काय करते आहे, कोणत्या बातम्यांना कशा प्रकारे प्रसारीत करत आहे हे सुध्दा दर्शक पाहतच असतील. पण तपासणीच नाही. हे मात्र दुर्देवी.
आभिषेक एकबोटेने मागे सुध्दा एका बालक/बालिकेला दत्तक दिल्याप्रकरणी बातमी केली होती. बाल त्या संदर्भाने खरे तर अल्पवयीन अर्थात 18 वर्षाखालील बालक किंवा बालिकेचे नाव बातमीत लिहायचे नसते किंवा सांगायचे नसते. हे सुध्दा आपल्या सुपूत्राला वडीलांनी शिकवलेले दिसत नाही. कारण तो कायदा आहे आणि कायद्याच्या विरुध्द झालेली ती बातमी आहे.
संबंधित व्हिडिओ….
