नांदेड(प्रतिनिधी)-वन्नाळी टोलनाका ता.देगलूर येथे पती-पत्नीला 4 जणांनी आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या हातातील 88 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या आहेत.
लक्ष्मी संजय पिंपरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचे पती दुचाकीवर जात असतांना 4 जण दोन दुचाकीवर आले आणि आम्ही पोलीस आहोत. असे सांगून लक्ष्मी पिंपरे यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या 88 हजार रुपये किंमतीच्या काढायला लावल्या आणि पर्समध्ये ठेवत असतांना हात चालाखी करून फसवणूक करून घेवून गेल्या आहेत. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 381/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या सोन्याच्या पाटल्या गायब केल्या
