काऊंटरमध्ये जिवघेणा हल्याचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यात लॉजमध्ये घडलेल्या प्रकाराला प्रतिहल्ला म्हणून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजमधील घटनेचा वेळ हा दुपारी 1.45 मिनिटाचा नमुद आहे. तसेच त्याला प्रतिहल्ला (काऊंन्टर) म्हणून दाखल केल्याचा गुन्ह्याचा वेळ दुपारी 3.05 वाजेचा आहे. तरी लॉजच्या गुन्ह्याचा क्र्रमांक 428 आहे आणि काऊंटर गुन्ह्याचा क्रमांक 427 आहे.
पोलीस ठाणे अर्धापूरच्या हद्दीत राहणाऱ्या एका अनुसूचित जातीच्या युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यासोबत संताजी भरकड नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला. त्यावेळी त्याने युवतीला धमकी दिली की, तुझ्या भावाला मारुन टाकतो. ती 21 जुलै रोजी डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे शिक्षणासाठी जात असतांना तिच्यासोबत दुसऱ्या दोन युवतीपण होत्या. दुपारी 1.30 वाजता कॉलेज समाप्त झाले. त्यावेळी संताजी भरकड, नितीन सपकाळ आणि शेखर पावडे असे तिघे दुचाकीवर आले आणि आम्हाला धमकी देवून स्वत:च्या दुचाकीवर बसवून गारवा लॉजमध्ये घेवून गेले. तेथे आमचे बळजबरीने आधारकार्ड घेतले आणि माझ्यावर अत्याचार केला. आमच्या पैकी एकाच्या भावाने येवून आमची तेथून सुटका केली. हा घटनाक्रम जातीविषयक सुध्दा आहे. म्हणून या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1), 351(2), 351(3) सोबत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(1) (आर), 3(1)(एस), 3(1)(डब्ल्यू), 3(1)(डब्ल्यू)(1), 3(1)(डब्ल्यू)(2), 3(2)(व्ही.ए) प्रमाणे हा गुन्हा क्रमांक 428/2025 दि.22 जुलै 2024 रोजी रात्री 8.20 वाजता दाखल झाला.
या प्रकरणाला काऊंटरम्हणून अमोल संजय भरकड यांनी तक्रार दिली की, दि.21 जुलैच्या दुपारी 3.05 वाजता भोकर फाटा येथील उड्डाणपुलाच्या बाजूला दिपक गोविंद सोनटक्के, मंगेश गजानन सोनटक्के, आकाश मनु सोनटक्के या तिघांनी त्याचा भाऊ संताजी यास तुमच्या बहिणीला का बोलतोस म्हणून डोक्या, डाव्या बरगडीवर, खांद्यावर, छातीवर, पोटावर मारुन गंभीर जखमी केले आणि खून करण्याचा प्रयत्न केला. यानुसार अर्धापूर पोलीसांनी तीन सोनटक्के बंधूविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 115(2), 3(5) आणि सोबत हत्यार कायद्या कलम 25 नुसार गुन्हा क्रमांक 427 दाखल केला आहे.
या दोन घटनांमध्ये लॉजमध्ये घडलेल्या घटनेच्या वेळेनंतर भोकर फाट्याची घटना घडली आहे. हे अभिलेखावर आहे. परंतू गुन्हा दाखल करतांना पहिला गुन्हा भोकरफाटा येथील घटनेचा दालख झाला आहे आणि दुसरा गुन्हा लॉजच्या घटनेचा दाखल झाला आहे. 23 जुलैची प्रेसनोट नांदेड जिल्हा पोलीस विभागाने जाहीर केली. त्यामध्ये फक्त गुन्हा क्रमांक 427 हाच नमुद करण्यात आला आहे. 428 चा उल्लेखमध्ये प्रेसनोटमध्ये नाही.
अर्धापूरमधील गारवा लॉजवर घडलेली घटना ऍट्रॉसिटीसह अत्याचार
