नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका चोरट्याला पकडून नांदेड ग्रामीण येथील 3 धर्माबाद येथील एक आणि तेलंगणा राज्यातील बोधन राज्यातील एक असे चार गुन्हे उघडकीला आणले आहेत. तसेच हा आरोपी भाग्यनगर, शिवाजीनगर येथील दोन गुन्ह्यात हवा असलेला आरोपी आहे. तसेच विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यामध्ये हवा आहे. तसेच वसमत शहर पोलीसांना सुध्दा हा चोरटा एका गुन्ह्यात हवा आहे. हा आरोपी तेलंगणा राज्यातील मुधोळ, बासर, तानुर आणि बोधन या पोलीसांना सुध्दा हवा आहे.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, पवार, कल्याणकर आणि पचलिंग या गुन्हे शोध पथकाने अमन एकबाल हुसेन उर्फ पटेल (21) रा.मस्तानपुरा विष्णुनगर यास ताब्यात घेतले. तो नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असतांना तो ज्या दुचाकीवर जात होता. ती दुचाकी पोलीसांनी जप्त केली आहे ती सुध्दा चोरीची आहे.
पकडलेल्या आरोपीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, धर्माबादमध्ये एक, बोधन तेलंगणा येथे एक असे चार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पकडलेला अमन एकबाल हुसेन उर्फ पटेल हा पोलीस ठाणे भाग्यनगर, शिवाजीनगर यांना त्यांच्याकडील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये हवा आहे. तसेच पोलीस ठाणे विमानतळ येथील दोन गुन्ह्यात तो हवा आहे. पोलीस ठाणे भोकर येथील एका गुन्ह्यात तो हवा आहे. पोलीस ठाणे वसमत शहर येथे एका गुन्ह्यात हवा आहे. सोबतच तेलंगणा राज्यातील पोलीस ठाणे मुधोळ, पोलीस ठाणे बासर, पोलीस ठाणे तानुर आणि पोलीस ठाणे बोधन यांनाही हा चोरटा हवा आहे. अशा प्रकारे अनेक चोऱ्या करणारा चोरटा नंादेड ग्रामीण पोलीसांनी जेरबंद केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी महाराष्ट्रासह तेलंगणात चोऱ्या करणारा चोरटा पकडला
