काल-परवा सरन्यायाधीशांनी सांगितले होते की, “महाराष्ट्रात काय चालते हे मला सांगू नका. राजकीय लढाई ही जनतेकडे ठेवा; तुम्ही आपले काम करा.”या वक्तव्यावरून असे विचार करता येईल की महाराष्ट्रात सत्तांतराच्या प्रक्रियेत इडी,सीबीआय,आयकर यांचा सुद्धा काही प्रमाणात हात आहे का?

आता समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने हनी ट्रॅप च्या माध्यमातून काही खेळ केला आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात, उद्धव ठाकरे गटाचे आ. रावसाहेब दानवे यांनी एक मोठा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ७२ अधिकारी, काही माजी मंत्री आणि खासदार अशा लोकांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यात आले आहे.हा संपूर्ण प्रकार नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात अशी भीतीही व्यक्त केली जात आहे की, या ट्रॅपच्या माध्यमातून सरकारमधील काही गोपनीय दस्तऐवज इतरांकडे गेले आणि त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

या प्रकरणावर विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न विचारला असता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नो हनी, नो ट्रॅप, इट इज फनी!” म्हणजे असा कोणताही प्रकार घडलेला नाही. त्यांनी स्पष्ट केले की, नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार केली होती, त्याचा तपास सुरू आहे. त्या तपासात नाशिकचे एक अधिकारी आणि ठाण्यातील काही महत्त्वाचे लोक सापडले असल्याचे ते म्हणाले.तथापि, यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो जाहीर केला असून, त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. या फोटोमध्ये फडणवीस सरकारमधील मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रफुल लोढा यांच्या हाताने काहीतरी खाताना दिसत आहेत.

प्रफुल लोढा हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असून त्यांना अटक झाली आहे. संजय राऊत म्हणतात की, आमचे चार तरुण खासदार हनी ट्रॅप प्रकरणामुळेच दुसरीकडे गेले. त्यामुळे या ट्रॅप प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी ते करत आहेत.त्याचबरोबर, संजय राऊत यांनी जे फोटो समोर आणले आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खोटं बोललं.या अगोदर विधानसभेत एक पेन ड्राईव्ह दाखवून काँग्रेस नेते नाना पाटोळे सांगत होते की या पूर्ण ड्राईव्ह मध्ये भरपूर काही आहे. करू काय सार्वजनिक ? पण त्यांना महाराष्ट्राच्या जनतेशी प्रेम असले असते तर नक्कीच पेन ड्राईव्ह सार्वजनिक केला असता. या वरून नाना पाटोळे हे हवा हवाइ बोणारे नेते आहेत हे स्पस्ट दिसते. संजय राऊत यांच्या पोस्टनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “हे प्रकरण नवीन असून, यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते.”
अटक झालेल्या प्रफुल लोढा यांनी एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला आहे. त्यात ते म्हणतात, “माझ्याकडे असे पुरावे आहेत की, एक बटन दाबल्यावर ७२ अधिकारी, ४ मंत्री आणि इतर नेत्यांचे खरे चेहरे समोर येतील. मला कोणत्याही सरकारला पुरावे द्यायचे नाहीत, मी हे सर्व लोकांसमोर उघड करीन.”त्यांनी त्यामध्ये आपला मोबाईल दाखवला असून, त्यात काही व्हॉट्सॲप कॉल्स चे तपशील आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.प्रफुल लोढा यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या सर्व माहितीबाबत माहिती आहे.त्यांनी असेही सांगितले की, “मी आई आणि बहिणींचा सन्मान करतो, म्हणून मी गप्प आहे. पण मी जर एक बटन दाबले, तर सगळं उघड होईल.”प्रश्न असा आहे की, या हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढा यांची भूमिका काय आहे? त्यांनी ही माहिती कुठून मिळवली आणि तिचे स्त्रोत काय आहेत?भारतासारख्या देशात अनेकदा सरकार, ईडी, सीबीआय, आणि इन्कम टॅक्स सारख्या संस्था वापरून दबाव आणला जातो.हा सध्या चर्चेत असलेला सीडीचा प्रकार देखील नविन नाही. यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींना दिल्लीकडे वाटचाल करताना संजय जोशी हे अडथळा होते.त्यावेळी एक सीडी व्हायरल झाली होती आणि संजय जोशी यांच्यावर अनैतिक संबंधांचे आरोप झाले. ही सीडी भोपाल आणि येथून व्हायरल झाली होती. फॉरेन्सिक तपासणीनंतर ही सीडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.तरीही त्यांचे राजकीय आयुष्य संपले आणि नरेंद्र मोदी दिल्लीला गेले.संजय राऊत यांचे आरोप जर खरे असतील आणि चार खासदार खरोखरच या ट्रॅपमुळे भाजपकडे गेले असतील, तर महाराष्ट्रातील राजकारण किती नीच पातळीवर गेले आहे हे लक्षात येते.
