नांदेड(प्रतिनिधी)-उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात आज नांदेडला आले असतांना शिवसेनेचे सुरूवातीपासूनचे कार्यकर्ते बंडू खेडकर यांनी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांना शिवसेना स्टाईलने प्रश्न विचारले. त्यांचा बचाव करण्यासाठी मध्यस्थी करणारे स्थानिक शिवसेनेचे सदस्य मनोज यादव यांना सुध्दा शिवसेना स्टाईलने बंडू खेडकर यांनी प्रसाद दिला.
आज नांदेडमध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात सहभागी होण्यासाठी संपर्क प्रमुख बबन थोरात आले होते. विश्रामगृहाच्या पहिल्या मजल्यावरील त्यांच्या कक्षात जावून शिवसेना पक्षाचे जुने कार्यकर्ते तथा नांदेडचे माजी आमदार प्रकाश खेडकर यांचे बंधू बंडू खेडकर यांनी शिवसेना स्टाईलनेच त्यांना बरेच प्रश्न विचारले. यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या स्थानिक कार्यकर्ते मनोज यादव यांना सुध्दा शिवसेना स्टाईलने प्रसाद दिला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस निरिक्षक पुरी, त्यानंतर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार हे विश्रामगृहात आले आणि त्यांनी या शिवसेना स्टाईलच्या प्रश्नोत्तरांना थांबविले. त्यानंतर बबन थोरात यांना उध्दव ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी जातांना पत्रकारांनी प्रश्न विचारले तेंव्हा मला काही झाले नाही. पण मनोज यादवला मारहाण झाल्याचे सांगितले आणि ते पटकन तेथून निघून गेले.
पोलीसांनी बंडू खेडकर यांना विश्रामगृह सोडण्यास सांगितले असतांना ते अगोदर पत्रकारांना बोलले. बंडू खेडकर सांगत होते की, शिवसेना विक्रीला काढली आहे. अशा पध्दतीत आम्ही बबन थोरातला आम्ही असेच उत्तर देवू. जिल्हाप्रमुखासाठी 20 लाख तालुकाअध्यक्ष पदासाठी 7 लाख, महानगराध्यक्ष पदासाठी 5 लाख रुपये असा बबन थोरातचा दर ठरलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड उत्तरचे शिवसेना तिकिट विक्री झाले होते असा प्रश्न विचारला असांना बंडू खेडकर म्हणाले त्याचा आकडा सर्वांनाच माहित आहे. कोठे आहेत संगिता डक पाटील शिवसेना पक्षाच्या कोणत्याही संघटन कार्यक्रमामध्ये आपण पाहिल्या काय?, आपल्याला दिसल्या काय असे प्रतिप्रश्न विचारून उत्तर दिले.
बबन थोरात संदर्भाने आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना सुध्दा तक्रार केलेली आहे. त्यांनी त्यावेळेस ऐकले नाही पण आजची घटना त्यांना कळेल. त्यानंतर तरी ते काही कार्यवाहीचा विचार करतील. आमचे चुक असेल तर आमच्यावर काही कार्यवाही होईल. त्यांचे चुक असेल तर त्यांच्यावर कार्यवाही होईल. पण यानंतर ज्या-ज्यावेळेस बबन थोरात नांदेडला येईल त्या-त्या वेळेस अशाच शिवसेना स्टाईलने आम्ही त्याला उत्तर देवू तो काही दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे काय? असा प्रश्न बंडू खेडकर यांनी उपस्थित केला. माझे बंधू स्व.आ.प्रकाश खेडकर यांनी येथे उभी केलेली शिवसेना पुर्ण पणे विक्री होत आहे त्याचाच राग मी आज व्यक्त केला आहे.
शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात आणि स्थानिक कार्यकर्ते मनोज यादव यांना बंडू खेडकरांचे शिवसेना स्टाईल प्रश्नोत्तर
