नांदेड : पुष्पा जगदीश कदम(६८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रूग्णालयात आज निधन झाले असून आज दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कैलासनगर(भाग्यनगर चौरस्ता)येथून अंत्ययात्रा निघून गोवर्धनघाटला अंत्यविधी करण्यात येणार आहेत.पुष्पा कदम या जिल्हा परिषदेच्या हायस्कूल मध्ये सहशिक्षिका ते मुख्याध्यापिका असा प्रवास त्यांनी केला आहे .नांदेड येथील मुलींचे हायस्कूल आणि मालेगाव येथील जि.प.हायस्कूल येथे दीर्घकाळ सेवा बजावली.उत्कृष्ट शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेतर्फे गौरव.कुरूंदा येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक नानासाहेब दळवी यांच्या कन्या तसेच साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांच्या पत्नी.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,दोन नातू असा परिवार आहे.
More Related Articles
विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांचा आदिलाबाद मार्गावर सविस्तर पाहणी दौरा
नांदेड – विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी मंगळवार, दिनांक 20 जानेवारी 2026…
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा विधानसभा निवडणुकीत वचपा काढणार – प्रा. राजू सोनसळे
नांदेड (प्रतिनिधि)-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात सन 1967…
महाविहार बावरीनगरच्या विकास कामांना गती: जिल्हाधिकारी
नांदेड – भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या अंतर्गत महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड…
