बंगालचे राज्यपाल होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सातत्याने अडचणीत टाकले, आणि त्याच ‘कर्तृत्वा’मुळे त्यांना उपराष्ट्रपतीपद मिळाले, असे म्हणले जाते. त्यांनी विरोधी पक्षांवर केलेला दबाव आणि दिलेल्या धमक्या त्यांच्या भविष्यातील राजकीय आकांक्षांसाठीच होत्या. त्यांना राष्ट्रपतीपदाची स्वप्ने होती. मात्र, 2027 पर्यंत कार्यकाळ असतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला.’नथिंग गोइंग ऑन रेकॉर्ड’ हे नड्डा यांचे विधान म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. राज्यसभेचे सभापती हेच ठरवतात की काय अभिलेखात नोंदवले जाईल. हे नड्डा यांना माहीत नव्हते का, हा प्रश्न आता उपस्थित होतो.

धनखड यांची कारकीर्द आणि स्वप्ने आता संपली आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. आता विरोधी पक्षांसमोरही मोठे आव्हान आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि संबंधित मुद्द्यांवर सखोल अभ्यास करून, सभागृहात देशाच्या समोर खरी परिस्थिती मांडणे.या संपूर्ण प्रकरणातून देशात लोकशाहीची काय स्थिती आहे, हे दिसून येते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वप्नांचा चुराडा भारतीय जनता पक्षाने केला, हे लिहिताना मनाला खंत वाटते.
