भारताच्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. परंतु त्यांच्या दत्तक पुत्राची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. ध्रुव,(काल्पनिक नाव) ज्याला त्यांनी झारखंडच्या राज्यपाल असताना २०१५ मध्ये दत्तक घेतले होते, आज वसतिगृहात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत आहे.ध्रुव सांगतो, “मम्मी म्हणजे द्रौपदी मुर्मू यांना भेटायची खूप इच्छा आहे. पूर्वी सणांच्या वेळेस गिफ्ट यायची, चॉकलेट यायचे, पण आता तीन वर्षांपासून काहीही आलेलं नाही.”

ध्रुव सध्या झारखंडमधील लोएला शाळेच्या वसतिगृहात राहतो. तेथे त्याला बाथरूम आणि किचनची साफसफाई करावी लागते. तो म्हणतो, “जर आम्ही ही कामं केली नाहीत, तर आम्हाला वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकी दिली जाते.” एक लोखंडी पेटी, काही कपडे आणि एकटे चप्पल – एवढंच त्याचं सर्वस्व आहे.

दत्तक घेण्यामागची कहाणी
ध्रुवचा जन्म एका दुर्दैवी घटनेतून झाला. एका नक्षलवाद्याने अत्याचार केलेल्या महिलेच्या पोटी त्याचा जन्म झाला. त्या महिलेला परिस्थितीमुळे मुलाची जबाबदारी घेणे शक्य नव्हते. त्यांनी अनेकांना विनंती केली, वर्तमानपत्रांतून जाहिरात दिली – “माझ्या मुलाला दत्तक घ्या.”ही बाब तत्कालीन झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मूंना समजली आणि त्यांनी त्या मुलाला दत्तक घेतले. तेव्हा त्यांनी शिक्षण, देखभाल याची पूर्ण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले. ध्रुवचे एका बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेशही करून दिला. त्यावेळी अनेक गिफ्ट्स, चॉकलेट्स, सणांच्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोहोचायच्या.पण २५ जुलै २०२२ रोजी मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर ध्रुवला भेटणे, बोलणे, काहीही पाठवणे थांबले. ध्रुव म्हणतो, “मी आठवीत शिकतोय. मम्मी मला आता ओळखत नाहीत का?”

प्रश्न उपस्थित होतात…
ध्रुवचा प्रश्न केवळ एक बालकाचा नाही – तो व्यवस्थेचा आरसा आहे. जर भारताच्या राष्ट्रपतींचा दत्तक मुलगा उपेक्षित असेल, तर सामान्य जनतेची अवस्था काय असणार?आजही तो पेन, साबण, कपडे या गोष्टींसाठी मित्रांकडे मागतो. अशी परिस्थिती द्रौपदी मुर्मूंनी निर्माण केली का, की ती त्यांच्याकडून दुर्लक्षित झाली? ही गोष्ट मन हेलावून टाकते.

दायित्वाची आठवण
राष्ट्रपतींचे पद हे केवळ सन्मानाचे नसून, जबाबदारीचे आहे. जर आपण एका मुलाला दत्तक घेतले, तर त्याच्याशी आईसारखे नातं टिकवणे, त्याच्या भावना समजून घेणे ही केवळ नैतिक नव्हे, तर मानवी कर्तव्य आहे.
राहुल गांधींची तुलना एक विचार
या साऱ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा उल्लेख येतो. त्यांनी अनेकवेळा गरजू लोकांना गुप्तपणे मदत केली. बातम्यांशिवाय, प्रसिद्धीशिवाय. निर्भयाच्या भावाला पायलट बनवणे, गरीबांच्या घरात जाऊन मदत करणे, अशा अनेक उदाहरणांनी त्यांची “नेकी कर, दरिया में डाल” ही वृत्ती दिसून आली.
शेवटचा विचार
आज ध्रुव वसतिगृहात एका कोपऱ्यात गप्प बसून आईची वाट पाहतोय. जो मुलगा कधी राष्ट्रपती भवनात गेला, त्याला आता साबण, पेनसाठी ही झगडावे लागत आहे.ध्रुवचा प्रश्न भारतातील प्रत्येक सुजाण नागरिकाला विचार करायला भाग पाडतो. आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा दत्तक मुलगाही जर इतका उपेक्षित असेल, तर ‘जनतेच्या’ मुलांचे काय?

