एखाद्या मूर्ख माणसाच्या हातात हत्यार लागले तर तो त्या हत्याराने इतर अनेकांना जखमी करू शकतो आणि स्वतःलाही इजा करून घेतो. याचा काही नेम नसतो आणि त्याबाबत निश्चित काही सांगताही येत नाही.
भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत हुशार आणि ताकदवान खासदार आहेत. त्यांपैकी एक म्हणजे निशिकांत दुबे. दिल्लीतील सत्ता त्यांचा वेळोवेळी गरजेनुसार उपयोग करत असते. हा उपयोग आहे की दुरुपयोग, याचा निर्णय आम्ही वाचकांवर सोडत आहोत.एका पॉडकास्टमध्ये निशिकांत दुबे यांनी अनेक वक्तव्ये केली, ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनजी भागवत यांना आरसा दाखवला, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून “गोरखपूरला जाणारा रस्ता दुरुस्त करून घ्या,आपणास तेथे जायचे आहे,” असे शब्द वापरले.

याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा यांच्याबद्दलही भाष्य करताना म्हटले की, “ते मोठमोठे दावे करतात. सांगतात की भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. १७ देशांनी आम्हाला सर्वोच्च सन्मान दिला आहे, २७ देशांच्या संसदांमध्ये मोदींनी भाषण केले आहे.” परंतु हे कोणी सांगत नाही की नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आतापर्यंत ७०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.हे सर्व दावे खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या विधानांनी शून्य करून टाकले आहेत.
१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले, त्यात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्या काळात अमेरिका आमच्या विरोधात उभी राहिली होती, तरीही आम्ही माघार घेतली नाही. इंदिरा गांधींनी निर्णायक निर्णय घेतला होता. सेना प्रमुख जनरल माणिक शॉ यांच्या नेतृत्त्वामुळे हे शक्य झाले. आजही त्या विजयामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर घेतले जाते. त्या काळात बांगलादेश निर्माण झाला, ज्याचे पडसाद आजही जाणवत आहेत.

निशिकांत दुबे म्हणाले की, “इंदिरा गांधींनी बांगलादेश बनवून चूक केली. जर बनवायचाच होता, तर हिंदू बांगलादेश वेगळा आणि मुस्लिम बांगलादेश वेगळा बनवायला हवा होता.” पण बांगलादेशातील बहुतांश हिंदूंनी त्या वेळी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. दुबे यांना कदाचित याची माहिती नसेल.बांगलादेश निर्माण झाल्यानंतर तेथील हिंदूंनी शेख मुजीबूर रहमान यांना आपला नेता मानले होते. काहीजण भारतात विलीन होण्याचा विचारही करत होते, असे आता निशिकांत दुबे यांना वाटत असावे.
, “आज आम्ही ऑपरेशन सिंधूरच्या गाथा गात आहोत. माध्यमांमध्ये दाखवले जात आहे की कराचीवर हल्ला झाला आहे, इस्लामाबाद नष्ट झाला आहे, आम्ही अनेक जागा ताब्यात घेतल्या आहेत. मग आजचे सरकार पीओके का ताब्यात घेत नाही?”जर इंदिरा गांधींनी बांगलादेश निर्माण करून चूक केली असेल, तर नरेंद्र मोदींनी युद्धविराम करून तशीच चूक केली आहे, असे पत्रकार अशोक वानखेडे यांचे मत आहे.योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल प्रश्न विचारताना दुबे म्हणाले की, “मला वाटते की पुढची १५-२० वर्षे फक्त मोदींचेच नेतृत्व दिसणार आहे. मोदी नसतील, तर भाजप १५० जागा सुद्धा जिंकू शकणार नाही.”त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की २०१४ ते २०२४ या काळात देशात फारशी प्रगती झालेली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, बेरोजगारी कमी झाली नाही, गरिबी हटलेली नाही, आणि देशाला जागतिक स्तरावर फारसा आदर मिळालेला नाही. जर भाजपचे दावे खरे असते, तर २०२४ मध्ये पक्षाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या.

निशिकांत दुबे यांच्याच म्हणण्यानुसार, २०१४ ते २०२४ या कालखंडात भाजपने फारसे कार्य केलेले नाही. देशावर केवळ कर्ज वाढले आहे. पंतप्रधानांचे स्वागत समारंभ, भाषणे आणि स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यावरच भर राहिला आहे.ते म्हणतात की भाजप निवडून येते कारण मोदी आहेत. मोदी नसते तर १५० खासदारही निवडून आले नसते. भाजपला हे आता मान्य करावे लागेल.पत्रकार अशोक वानखेडे यांच्या मते, २०२४ मध्ये भाजप फक्त १८० जागा जिंकू शकली आहे आणि त्यापैकी ६० जागा मशीनमुळे मिळाल्या, असे एडीआरने नमूद केले आहे.मोदींच्या समर्थनात बोलता बोलता निशिकांत दुबे यांनी त्यांनाच एकप्रकारे पिंजऱ्यात उभे केले आहे.
स्मिता प्रकाश यांनी विचारले की, मोहन भागवत म्हणतात की ७५ वर्षांनंतर निवृत्त व्हावे, त्यावर दुबे म्हणाले की, “आज भाजपला मोदींची गरज आहे. हे पक्ष केवळ व्यक्तिमत्त्वावर चालतात. त्यामुळेच मोदी आहेत म्हणून पक्ष चालतो.” मग मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव यांचे काय? जर ते त्यांच्या पक्षांमध्ये आहेत तर त्यांना ‘घराणेशाही’ का म्हणायचे?भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरत नाही यावरही त्यांनी भाष्य केले. अमित शहा म्हणाले होते की, “आमच्या पक्षात लोकशाही आहे, म्हणून अध्यक्ष निवडायला वेळ लागतो.” पण दुबे यांनी स्पष्टपणे म्हटले की समस्या भरपूर आहेत, याचा अर्थ शहा खोटे बोलले. निशिकांत दुबे यांनी आपल्या पक्षावर, नेत्यांवर आणि धोरणांवर उघडपणे टीका केली आहे. त्यामुळे असे वाटते की एखाद्या मूर्खाच्या हातात वस्तरा दिला तर तो स्वतःलाही जखमी करतो आणि इतरांनाही.
