नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेला विष पाजवून तिचा मृत्यू घडविल्याप्रकरणी काही जणांविरुध्द मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 9 जुलै ते 10 जुलै 2025 दरम्यान राठोडवाडी तांडा ता.मुखेड येथे घडली आहे.
वामन देवदास चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 ते 10 जुलै दरम्यान राठोडवाडी तांडा येथे सुधाकर राजाराम राठोड, राजाराम सदाशिव राठोड, मोत्याबाई राजाराम राठोड, सदाशिव राजाराम राठोड यांनी ताऊबाई सुधाकर राठोड (18) हिला लग्नात ठरल्याप्रमाणे 1 लाख रुपये हुंडा घेवून ये म्हणून शिवीगाळ केली, जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिला विष पाजवून तिचा खून केला आहे. ताऊबाईवर उपचार सुरू असतांना 13 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. मुखेड पोलीसंानी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 163/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
