नांदेड:- राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे 14 जुलै 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 14 जुलै 2025 रोजी ता. महागाव जि.यवतमाळ येथून वाहनाने सकाळी 11.30 वा. नेताजी सुभाषचंद्र बोस आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, नांदेड येथे आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.50 वा. शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम जवळ, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.55 वा. शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम जवळ, नांदेड येथे आगमन. दुपारी 4 वा. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार-2025 सोहळयास उपस्थिती. सायं. 6.05 वा.वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
