बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदनगरच्या जवळ सुमारे ५०० मीटर उंचीवरून कोसळले. या दुर्घटनेत २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक चर्चा रंगल्या,नेमकं काय झालं असेल? कशामुळे अपघात घडला? यामागे कोणाचा हात आहे? विदेशी हस्तक्षेप आहे का? गद्दारीचा प्रकार आहे का? अशा चर्चा तेव्हापासून सुरू आहेत.

आता, अमेरिकेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्या अपघाताच्या क्षणी एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो की, “तू इंधनाचं बटन बंद केलं का?” त्यावर दुसरा पायलट “नाही” असं उत्तर देतो. या संवादातून असा अर्थ निघतो की, ड्रीमलाइनर तयार करणाऱ्या बोईंग कंपनीची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी अखेर दोष पायलटवर ढकलण्यात आला आहे.ऑल इंडिया पायलट असोसिएशनने या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार आशिष चित्रांशी आणि अशोक वानखेडे यांच्या जुन्या विश्लेषणांमध्येही आधीच सांगितले गेले होते की, दोष मरण पावलेल्या पायलट्सवर टाकण्यात येईल आणि केस लवकरच मिटवली जाईल, आणि तसंच आज घडताना दिसत आहे.

तथापि, अनेक वरिष्ठ आणि अनुभवी पायलट्स अजूनही या घटनेविषयी साशंक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, हा प्राथमिक अहवाल आहे आणि दुसऱ्या अहवालातून हे स्पष्ट होईल की इंजिनला इंधन का मिळालं नाही. कारण प्रत्येक विमानात अशी प्रणाली असते की, यंत्रणा बंद झाली तरी ती काही वेळात आपोआप पुन्हा कार्यरत होते. मात्र, त्या वेळेची मर्यादा येथे मिळाली नाही, आणि कदाचित त्यामुळेच अपघात झाला.विशेष बाब म्हणजे, अमेरिकन वृत्तपत्रात आलेल्या या प्राथमिक अहवालावर कोणत्याही अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी नाही. मग हा अहवाल पत्रकारांपर्यंत लीक कसा झाला? याची चौकशी कोणी करणार? आणि याची जबाबदारी कोण घेणार?

दुर्दैवाने, आता मरण पावलेल्या पायलट्सवर दोष ठेवला जात आहे. जे आता आपली बाजू मांडूही शकत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की, ही सगळी कार्पोरेट दलाली आहे का? आपल्या देशाच्या नेतृत्वाने विदेशी कंपन्यांसाठी हे घडवून आणलं आहे का? मोदी समर्थक असलेले अजित भारती यांनीही आता याविरोधात बंडखोर भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, रात्री २.३० वाजता अमेरिकेतील अहवाल जाहीर झाला आणि त्यात इंधन स्विच बंद झाल्याची माहिती समोर आली. पण हे स्पष्ट नाही की, पायलटने तो स्विच बंद केला की तो आपोआप बंद झाला.

इंधनाचा स्विच सहजासहजी बंद होत नाही. त्यासाठी सुरक्षा कव्हर उघडावं लागतं, हाताने जोर लावावा लागतो. सह-पायलटच्या नकळत हा स्विच बंद होणे शक्य नाही. त्यामुळे या अहवालात अनेक साशंक बाबी आहेत.डिजीसीएने अपघातानंतर केलेल्या ऑडिटमध्ये १५ गंभीर चुका आढळल्या होत्या. याचा अर्थ असा की, आपली विमाने “देवाच्या भरोशावर” उडत आहेत. अनेक बोईंग ७८७ विमाने नंतर उड्डाण करत नव्हती किंवा तांत्रिक कारणाने परत बोलावण्यात आली होती.भारती म्हणतात की, मीडियाला सुद्धा पैसे देऊन खरेदी केलं गेलं आहे आणि बातम्या दडपल्या जात आहेत. अशा सरकारकडून पारदर्शक चौकशीची अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे.

२०१८ मध्ये अमेरिकेच्या विमान प्रशासनाने (FAA) बोईंग ७८७ च्या कंट्रोल स्विच लॉकिंगमध्ये त्रुटी असल्याची नोंद केली होती. पण एअर इंडियाने त्या निरीक्षणांकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला ‘परामर्श स्वरूपाचं’ मानलं.कॅप्टन कबीर मलिक यांचं म्हणणं आहे की, कोणत्याही अपघातात पायलट प्रथम आलेल्या अॅलार्मवर लक्ष केंद्रित करतो. विमानात स्वतःची सुरक्षा प्रणाली असते आणि कोणतीही यंत्रणा बंद झाली तरी ती पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी काही वेळ आवश्यक असतो. पण या अपघातात तेवढा वेळच मिळाला नाही.

त्याचं मत आहे की, पायलट्सनी विमान लोकवस्तीपासून दूर नेऊन जास्तीत जास्त जिवितहानी टाळण्याचा प्रयत्न केला. जर विमानाची उंची १५०० ते २००० मीटर असती, तर कदाचित सगळे वाचले असते.फ्युएल टाकीपासून इंजिनपर्यंत इंधन पोहोचत होतं हे आता सिद्ध झालं आहे. पण इतक्या कमी वेळात यंत्रणा पुन्हा सुरू होण्याची संधीच मिळाली नाही.त्यामुळे केवळ पायलट्सवर दोष टाकणं चुकीचं आहे. या प्रकरणाची पूर्ण आणि पारदर्शक चौकशी व्हायला हवी.आजवरच्या अहवालात ‘इंधन स्विच बंद’ हे कारण सांगितलं जात आहे, पण ‘ते का बंद झालं’ याचे उत्तर अजून मिळालेलं नाही. हे बटन सहजपणे बंद होणारं नसल्यामुळे, यामागे तांत्रिक बिघाड, सॉफ्टवेअर समस्या की मानवी चूक, हे स्पष्ट होण्यासाठी दुसऱ्या तपासणी अहवालाची वाट पाहणं गरजेचं आहे.

