नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक परशुराम चव्हाण (72) यांचे आजाराने निधन झाले आहे. आज सायंकाळी 4 वाजता परोटी ता.किनवट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत.
आपल्या संपुर्ण पोलीस सेवेत उत्कृष्ट नाव कमावलेले आणि पोलीस निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले परशुराम चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मित्र परिवाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मुळ गाव परोटी ता.किनवट येथे त्यांच्यावर आज सायंकाळी 4 वाजता अंतिमसंस्कार केले जाणार आहेत. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा चव्हाण कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक परशुराम चव्हाण यांचे निधन
