काल सिव्हील मॅटर असलेला प्रकार खरे तर भुखंड माफीयांचा सुळसुळाट

नांदेड(प्रतिनिधी)-काल गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी सर्वत्र गुरूची महिमा गायीली जात असतांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रात्री 3 वाजता एका महिलेला हे मॅटर सिव्हील आहे असे सांगून तिला मदत केली नाही. त्यानंतर महिला घेवून आलेल्या तक्रारीतील जागेवर पोलीसांच्या समक्ष ताबा बदलण्यात आला. मग सिव्हील मॅटरच होते. तर मग पोलीस ताबा बदलेपर्यंत तेथे का थांबली. सोबतच सिव्हील मॅटरची अंमलबजावणी रात्रीच का होते या आशयाचे वृत्त वास्तव न्युज लाईव्हने कालच प्रसिध्द केले होते. परंतू या घटनेचा मागोवा घेतला असता आयटीआय भागातील तनिष्क या सोन्याच्या दुकानाशेजारी 22 हजार 400 चौरस फुट जागेचा हा वाद आहे. काही संपत्ती विषयक कामकाज करणाऱ्या लोकांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीत या जागेची किंमत 25 हजार रुपये चौरस फुट आहे. वाचकांनी गुणाकार करून तो आकडा किती येतो हे स्वत: तपासून घ्यावे.
काल गुरूपौर्णिमेच्या दिवशीचा सुर्योदय झाल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या एका व्हिडीओवरून वास्तव न्युज लाईव्हने सिव्हील मॅटर रात्रीच का अंमलात आणले जातात. अशा मथळ्याची बातमी प्रसिध्द केली. त्यानंतर या घटनेचा मागोवा घेतला तेंव्हा कळले की, ही जागा सर्व्हे नंबर 61-2-ब आणि सर्व्हे नंबर 61- ब या वादात आहे. या जामीनी पुर्वी कोणी तरी सालेहबिन अब्दुल चाऊसच्या होत्या. सन 1966 मध्ये चंद्रकांत रतीलाल मेहता यांनी 1966 मध्ये खरेदी केली होती. पण यामध्ये पुढे वाद झाला. त्या वादातून हे प्रकरण न्याय प्रविष्ठ झाले. त्या प्रकरणाचा क्रमांक विशेष दिवाणी खटला 57/2011 असा होता. या अगोदरच चंद्रकांत केरबा गंजेवार यांनी हे सर्व्हे नंबर 62-2-ब आपल्या नावावर लावून घेतले होते. त्याचा सिटी सर्व्हे क्रमांक 6368 असा आहे. या वादात न्यायालयाने असा आदेश दिला की, ही वादग्रस्त जागा चंद्रकांत रतीलाल मेहता यांनी जयंतीलाल दोशी यांच्या नावावर करून द्यावी हा निकाल 24 मे 2022 रोजी आला होता. प्राप्त असलेल्या कागदपत्रांमध्ये या प्रकरणाची अपील सुरू असल्याचे लिहिले आहे. हेमंत रतीलाल मेहता यांचा मृत्यू दि.13 नोव्हेंबर 2024 रोजी झाला आणि भुमिअभिलेख कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार गंजेवारचे नाव कमी करून चंद्रकांत मेहताचे नाव पीआरकार्डवर जोडल्याची तारीख 21 मार्च 2025 रोजी आहे. खरे तर न्यायालयाच्या आदेशानुसार ही जमीन चंद्रकांत मेहताने दोषी यांना करून द्यायला हवी. आज चंद्रकांत मेहता जीवंत नाहीत. तर त्यांच्या वारसदारांनी दोषीला करून द्यायला हवी.

व्हिडिओ…

पुर्वी 15 मे 2023 रोजी 86 वर्षांच्या चंद्रकांत रतीलाल मेहताने एक मृत्यूपत्र लिहिले. त्यामध्ये माझी मिळकत मी मे. विसावा हॉस्पीटॅलीटीचे भागिदार गजानन किशनलाल मुधोळ व बालाजी नागोराव ईबितवार यांना विक्री करत आहे. त्यासाठी मी इशारा रक्कम पण स्विकारली आहे. न्यायालयात वेगवेगळे वाद सुरू आहेत. त्यांचा निकाल कधी लागेल माहित नाही. पण मी यांच्याकडून काही रक्कम स्विकारली आहे आणि त्यासाठी मी हे इच्छापत्र करत आहे. या इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून गजानन बालाजीराव मोरे आणि शुभम नागोराव कुंडगिर यांची नावे आहेत. हे इच्छा मृत्यूपत्र नोंदणीकृत आहे. त्याचा क्रमांक 3932/2023 असा आहे. खरे तर इच्छा मृत्यूपत्र तयार होत असतांना त्यात इसारा रक्कम घेतली असे शब्द नमुद आहे म्हणजे तो करार झाला. इच्छा मृत्यू पत्र हे तयार करणाऱ्या व्यक्तीकडे किंवा कोण्या विशिष्ट व्यक्तीकडे नसावे. ते त्रयस्थ व्यक्तीकडे ठेवलेले असावे आणि त्यानंतर त्याने इच्छा मृत्यूपत्र तयार करणाऱ्याच्या मृत्यूनंतर ते उघड करायचे असते. सोबतच इच्छा मृत्यू पत्र उघड झाल्यानंतर न्यायालयातून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. ही झाली की, नाही ते माहित नाही. पण कायद्याती सुरक्षा करणाऱ्या भुमि अभिलेख कार्यालयाने न्यायालयाकडून अंमलबजावणी झाली नसतांना सुध्दा मे.विसावा हॉस्पीटॅलिटीची नोंद पीआर कार्डमध्ये घेतलेली आहे.
दि.21 जून 2025 रोजी चंद्रकांत मेहताच्या सुनबाई लता हेमंत मेहता यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे एक अर्ज दिला. त्यात माझ्या मालकीच्या व ताब्यातील जागेत असलेली झाडे तोडून नेणाऱ्या दोन अज्ञात लोकांविरुध्द कार्यवाहीची मागणी केली. त्या अर्जातील शब्दांप्रमाणे त्यांच्या जागेचा सीटी सर्व्हे नंबर 61-2-ब असा आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 22 हजार 400 चौरस फुट आहे. तेथे 20 जून रोजी सायंकाळी 6 वाजता तेथे झाडे तोडणाऱ्या माणसांना माझ्या जागेतील झाडे का तोडता याची विचारणा केली तेंव्हा ते लोक सांगत होते की, आम्हाला अजून झाडे तोडायची आहेत आणि आम्ही बालाजी नागोराव ईबितदारने पाठविलेले लोक आहोत. माझ्या भुखंडावरील झाडे तोडून त्याचा ताबा घेण्याचा उद्देश बालाजी ईबितदार यांचा आहे. पण शिवाजीनगर पोलीसांनी त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. कारण हे सिव्हील मॅटर आहे.
दि.7 जुलै 2025 रोजी सकाळी 5.52 वाजता लता हेमंत मेहता यांनी त्या ठिकाणी आपल्या नावाचे दोन बोर्ड लावले. एक बोर्ड जमीनीच्या आत होता आणि एक बोर्ड जमीनीच्या सिमेवर होता. त्यामध्ये लता हेमंत मेहता या स्वत: उभ्या आहेत आणि त्यावर जागा मालक सर्व्हे नंबर 61-2- ब असे लिहिलेले आहे. सोबतच लता हेमंत मेहता हे नाव लिहिलेले आहे आणि मोबाईल क्रमांक 9922547490 असा क्रमांक पण लिहिलेला आहे. हा फोटो गुगल मॅपसह काढलेला आहे. आजच्या युगात मोदकांचे चलन जास्त झाले आहे. या मोदकांची चलती नांदेडच्या हृदय मानल्या जाणाऱ्या भागात जास्त आहे, आणि त्यासाठी कोणीही काहीही विचार करायला तयार नाही आणि मोदकांवर प्रेम ठेवणाऱ्यांनी अत्यंत पध्दतशीरपणे कट रचून गुरुपौर्णिमेचा सुर्योदय होण्याअगोदरच रात्री लता हेमंत मेहता यांचे बोर्ड काढून फेकून दिले आणि आपल्या नावाचे बोर्ड लावले. त्यावर सर्व्हे नंबर 61-ब असे लिहिले आहे. मग या दोन क्रमांकाच्या वादात अडकलेली जागा नक्कीच कोठे तरी पाणी मुरवणारी आहे. चंद्रकांत रतीलाल मेहता यांच्या सुनबाई आहेत लता हेमंत मेहता म्हणजे क्रमांक कोणताही असेल त्या जागेतील त्या वारसदार म्हणून मालकच आहेत. याशिवाय सुध्दा हेमंत मेहता यांचे दोन भाऊ आहेत. त्यांची नावे उदय आणि निर्मल अशी आहेत. ते मुंबईमध्ये राहतात असा हा भुखंडचा खेळ नांदेडमध्ये सुरू आहे.
संबंधीत बातमी…

सीव्हील मॅटरच्या नावाखाली रात्री 3 वाजता जागेचा ताबा बदलला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!