राज्यात 10 नवीन आयपीएस अधिकाऱ्यांना उपविभाग

तीन जणांना पुन्हा एकदा बदल्या बदलून दिल्या
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने बदलून दिलेल्या बदल्या पुन्हा एकदा बदल्या आहेत. त्यात तीन अधिकाऱ्यांची नावे आहेत. तसेच दहा पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
कालच काही पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या ठिकाणी बदलून नवीन जागा दिल्या होत्या. त्यातील तीन जणांना पुन्हा नवीन जागी बदल्या दिल्या आहेत. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसळगाव आहिल्यानगर येथील समादेशक पद्मजा चव्हाण यांना पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे नियुक्ती दिली आहे. राहुल चव्हाण हे सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव वर्धा येथे होते. त्यांना आता समादेश रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड पुणे येथे बदली दिली आहे.दर्शन दुगड हे पोलीस उपअधिक्षक अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे होते. त्यांना सहाय्यक पोलीस अधिक्षक राज्य पोलीस नियंत्रण कक्ष मुंबई येथे नियुक्ती दिली आहे.
भारतीय पोलीस सेवेतील दहा पोलीस अधिकाऱ्यांनी आपले परिविक्षाधिन कालावधी पुर्ण केल्यानंतर त्यांना पहिले उपविभाग जारी केले आहेत. ज्या सहाय्यक पोलीस अधिक्षकांना उपविभाग मिळाले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. अनिकेत ज्ञानेश्र्वर हिरडे-उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा, गडचिरोली. निखिल बस्वराज पाटील-पोलीस उपअधिक्षक अकोट जि.अकोला, सिध्दार्थ बरवाल-उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर जि.नाशिक, प्रशांत सुरेश डगळे-चिमुर जि.चंद्रपुर, मयंक जाधव-तुमसर जि.भंडारा, अपरिजिता अग्नीहोत्री-कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर, रॉबीन बन्सल -पांढरकवडा जि.यवतमाळ, ऋषीकेश हनमंत शिंदे-आंबेजोगाई जि.बीड, अंजना कृष्णा व्ही.एस.-करमाळा जि.सोलापूर, सागर यशवंत खरडे-उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेळ जि.नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!