नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने बदल्या झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील 13 जणांना नियुक्त्या बदलून दिल्या आहेत. काही जणांना एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तसेच 5 अधिकाऱ्यांना नविन नियुक्त्या दिल्या आहेत आणि सहा अधिकाऱ्यांना पदोन्नती देवून नवीन पदस्थापना दिलया आहेत.
बदल्या झालेले अधिकारी ज्यांना नियुक्त्या बदलून दिल्या आहेत किंवा मुदतवाढ दिली आहे ते पुढील प्रमाणे आहेत.विजय कबाडे-पोलीस उपआयुक्त मुख्यालय सोलापूर शहर(पोलीस उपआयुक्त नागपूर शहर, यांना एक वर्षाची मुदतवाढ सोलापूर येथे दिली आहे). योगेश चव्हाण पोलीस अधिक्षक मुख्यमंत्री सुरक्षा यांची बदली पोलीस उपआयुक्त नाशिक शहर झाली होती. पण नवीन नियुक्ती पोलीस उपआयुक्त राज्य गुप्तवार्ताविभाग नवीन मुंबई येथे देण्यात आली आहे. अशोक थोरात हे पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. यांना अगोदर समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 चंद्रपुर येथे नियुक्ती दिली होती. ती बदलून अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ अशी नवीन बदली देण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त वाहतुक शहर पुणे येथील अमोल झेंडे यांना समादेशक रा.रा.पोलीस बलगट क्रमंाक 7 दौंड येथे बदली दिली होती. ती बदलून दक्षता अधिकारी पुणे महानगरविकास प्राधिकरण येथे नियुक्ती दिली आहे. दिपक देवराज हे सहाय्यक पोलीस महानिरिक्षक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई होते. त्यांना पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे येथे बदली दिली होती. परंतू त्यांना एक वर्ष मुदवाढ जुन्या जागेवर दिली आहे. सागर नेताजी पाटील हे पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 अमरावती शहर येथून पोलीस अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पाठविण्यात आले होते. परंतू ती रद्द करून सहाय्यक पोलीस महानिरिक्षक कायदा व सुरक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर पाठविले आहे. बृहन्मुंबई येथील परिमंडळक्रमांक 12 च्या पोलीस उपआयुक्त यांना पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग येथे बदली देण्यात आली होती. ती बदलून पोलीस अधिक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई अशी नियुक्ती दिली आहे. संजय बजबळे हे मिरा-भाईंदर-विसई-विरार येथे पोलीस उपआयुक्त होते. त्यांना सहाय्यक पोलीस महानिरिक्षक कायदा व सुरक्षा महाराष्ट्र राज्य मुुंबई येथे बदली दिली होती. ती रद्द करून पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे येथे नियुक्ती दिली आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेतील सुनिल लांजेवार यांना पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापुर अशी नियुक्ती मिळाली होती. पण ती बदलून पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ताविभाग छत्रपती संभाजीनगर अशी नियुक्ती देण्यात आली आहे. रत्नाकर नवले हे अपर पोलीस अधिक्षक नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र फोर्स-1 मुंबई येथे अपर पोलीस अधिक्षक होते. त्यांना पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण अमरावती येथे नियुक्ती मिळाली होती. पण ती बदलून पोलीस उपआयुक्त् छत्रपती संभाजीनगर अशी बदली मिळाली आहे. प्रशांत बच्छाव हे पोलीस उपआयुक्त नाशिक शहर या पदावर होते. त्यांना पोलीस अधिक्षक नागरीक हक्क संरक्षण कोल्हापूर अशी नियुक्ती देण्यात आली होती. ती बदलून आता पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक अशी बदली मिळाली आहे. रा.रा.पोलीस बल गट क्रमांक-2 पुणेच्या नम्रता पाटील यांना पोलीस उ पआयुक्त बृहन्मुंबई या पदावर पाठविले होते. पण आता शासनाने त्यांच ेपद बदलून पोलीस उपआपयुक्त रा.गुप्त वार्ता विभाग पुणे येथे नियुक्ती दिली आहे.
नवीन पदस्थापना दिलेले 11 अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिलेली आहे. अमोल गायकवाड-समादेशक आरआरबी 2 गोंदिया (अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा), पियुश जगताप-अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ(समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 17 चंद्रपुर), बजरंग बनसोडे-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पोलीस अधिक्षक दशहतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर), ज्योती क्षीरसागर-पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर) सोमनाथ वाघचौरे-समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड पुणे (अरप पोलीस अधिक्षक श्रीरामपूर), पदोन्नतीने पदस्थापना मिळालेले अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. विजय पांडूरंग लगारे-पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई, गणेश प्रविण इंगळे-पोलीस उपआयुक्त अंमली पदार्थ टास्क फोर्स, कृष्णात महादेव पिंगळे- पोलीस उपआयुक्त अंमलीपदार्थ टास्क फोर्स, मंगेश शांताराम चव्हाण-अपर पोलीस अधिक्षक लातूर, अभिजित तानाजी धाराशिवकर-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर, पद्मजा रघुनाथ चव्हाण-समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 19 कुसळगाव, आहिल्यानगर.
राज्यात 13 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बदलून नविन नियुक्त्या; पाच जणांना नवीन नियुक्त्या; सहा जणांना पदोन्नती देवून नियुक्त्या
