नांदेड(प्रतिनिधी)-पेनुर ता.लोहा येथे वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी मिळून एका 35 वर्षीय व्यक्तीचा त्यांच्या घरातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरुन खून केल्याचा प्रकार घडला आहे. सोनखेड पोलीसांनी तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे.
नवनाथ महपती अमलगोंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जून रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास पेनुर शिवारात त्यांचा मोठा भाऊ श्रीरंग महपती अमलगोंडे (35) यास भागवत लक्ष्मण अमलगोंडे, अंगद लक्ष्मण अमलगोंडे आणि त्यांचे वडील लक्ष्मण नारायण अमलगोंडे या तिघांनी काठी, मोडक्या दरवाज्याच्या चौकटीने जबर मारहाण करून खून केला आहे. आरोपींना श्रीरंग अमलगोंडेेचे आपल्या घरातील महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत याचा राग होता. म्हणून हा खून करण्यात आला. सोनखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 137/2025 प्रमाणे दाखल केली असून सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने अधिक तपास करीत आहेत. तिन्ही मारेकऱ्यांना सोनखेड पोलीसांनी अटक केली आहे.
पेनूर ता.लोहा येथे अनैतिक संबंधाच्या कारणातून खून; तिन्ही मारेकरी अटक
