‘ग्रोन्क’ हे माध्यम भारतीय जनता पक्षाने इतरांवर केलेल्या आरोपांची काही क्षणांतच सत्यता तपासते. त्यातील खोटेपणा उघड करते. त्यामुळे विरोधी पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्षाला ‘ग्रोन्क’ची जास्त भीती वाटत आहे. भाजपचे सर्व शूरवीर या ग्रोन्क समोर सपशेल फसले आहेत.

विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी ‘नरेंदर सरेंडर’ हा नारा दिल्यानंतर भाजप खूपच अस्वस्थ झाली आहे. भाजपचे नेते वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून हा नारा “घाणेरडा प्रकार” आहे, असे दाखवू पाहत आहेत. मात्र राहुल गांधींनी “भारत देशाने सरेंडर केले” असे म्हण्टलं नाही, तर “नरेंद्र मोदींनी सरेंडर केले” असे राजकीय दृष्टिकोनातून म्हटले होते.
राजकारणात अशी अनेक वक्तव्ये होत असतात. मग फक्त राहुल गांधींच्या एका शब्दावर भाजप एवढी का अस्वस्थ झाली आहे?
काँग्रेस पक्षाने ‘एआय व्हिडिओज’च्या माध्यमातून “नरेंद्र सरेंडर” ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करत, “सरेंडर करायला नको होते” असे दाखवले जात आहे. हे सर्व राजकीय व्यासपीठावर घडत आहे.
‘ग्रोन्क’ हे सोशल मीडिया ‘एक्स’वरील एक माध्यम आहे, जे खोट्या बातम्यांना उघड करते व सत्य काय आहे ते स्पष्ट करते.
भाजपचे खा. निशिकांत दुबे, जे परदेशात शिष्टमंडळासोबत गेले होते, त्यांनी एका पोस्टमध्ये दावा केला की, “1985 मध्ये कॅनडाला जाणारे एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या सांगण्यावरून पाडले गेले, ज्यात 329 लोक मरण पावले; 1986 मध्ये दुसरे विमान अपहरण झाले”. त्यात 22 जण मारले गेले होते. त्यांनी असा निष्कर्ष काढला की, त्या काळात पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानसमोर सरेंडर केलं.
पण ‘ग्रोन्क’ने त्यांच्या या दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले की:
1985 ची न्यूयॉर्क बैठक ही परमाणु विषयावर होती, हल्ल्यावर नव्हे.
सुपर कॉम्प्युटर व LCA एअरक्राफ्ट पाकिस्तानसोबत केलेले नव्हते.
अमेरिकेने 1986 मध्ये भारताला सुपर कॉम्प्युटर दिला होता.
LCA हे भारताचा स्वदेशी प्रकल्प आहे.
राजीव गांधींनी कोणतीही द्विपक्षीय बैठक अमेरिकेसोबत केली होती, असा कोणताही अभिलेख उपलब्ध नाही.
अमेरिकेची मदत ही तांत्रिक होती, आर्थिक नव्हे.
‘ग्रोन्क’चे म्हणणे आहे की निशिकांत दुबे यांचे वक्तव्य अपूर्ण व असमर्थनीय आहेत. त्यामुळे लोक म्हणत आहेत की, दुबे यांनी काही बोलण्याआधी ‘ग्रोन्क’ त्यांची पितळ उघड करेल, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
विदेशी दौऱ्यांमध्ये निशिकांत दुबे भारताचा सहिष्णू देश म्हणून गौरव करतात. पण जेव्हा परदेशात विरोधी पक्षाचे खासदार भारताची बाजू मांडतात, तेव्हा ते जुन्या सरकारांवरच गरळ ओकण्याचे काम करतात.

सोशल मीडियावर पंडित नेहरूंचा एक जुना फोटो व्हायरल केला जात आहे, ज्यात त्यांच्या पाठीमागे एक मुलगी त्यांना किस करताना दिसते. त्या फोटोवर “सरेंडर टू लव्ह” असे लिहिले आहे. ही मुलगी म्हणजेच नेहरूंची भाची नयनतारा सहगल असून, 1955 मध्ये लंडनमध्ये त्यांनी आपल्या मामाचे असे स्वागत केले होते. त्यांच्या समोर पाठमोरी दिसणारी महिला म्हणजे विजयालक्ष्मी पंडित (नेहरूंची बहीण आणि नयनताराची आई) आहेत.

या साध्या कौटुंबिक क्षणाचा चुकीचा अर्थ काढून भाजप समर्थक “नेहरू किती वाईट व्यक्ती होते” असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘नरेदर सरेंडर’ या एका शब्दाने भाजपला एवढी अस्वस्थता आली की, आता काहीही खोटं सांगितलं, दाखवलं जात आहे.

मात्र, खोट्या बातम्या प्रसारित करून जे भाजपचे लोक करत आहेत, त्यांना ‘ग्रोन्क’ काही क्षणांत उघड करतो. एक भाची आपल्या मामाचा मुका घेते, त्यावरून गैरसमज पसरवण्याचा उद्देश राजकीय असतो काय कि वैयक्तिक असतो.वाचकांनी अशा खोट्या प्रसारणावर सजग राहून स्वतःचे स्पष्ट मत व्यक्त करणे आ
