भारतातील जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर श्रद्धा ठेवतात, त्यांच्यासाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा ठरत आहे. आपल्या निर्णयांच्या माध्यमातून भूषण गवई संविधान आणि कायद्यांना अधिक बळकट करत आहेत. त्यांच्या अनेक निर्णयांमुळे सरकार सुद्धा अडचणीत आले आहे; सरकार आता फुंकून-फुंकून पाऊल टाकत आहे.न्या.चंद्रचूड यांनी सर्वोच न्यायालयातील बदलले जुने प्रतीक पुन्हा बहाल करण्याचा निर्णय न्या.गवई यांनी घेतला आहे.

आधीचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना प्राध्यापक बनवण्यात आले आहे. मात्र, संजीव खन्ना यांना अद्याप कोणतेही पद देण्यात आलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात एकही पद रिकामे न ठेवता सर्व पदे भरून घेण्याचे काम भूषण गवई यांच्या कार्यकाळात झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा सुप्रीम कोर्ट पूर्वीच्या स्वरूपात दिसेल.

सुप्रीम कोर्टातील काचेचे दरवाजे काढून टाकले जाणार असून, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे जुने प्रतीक चिन्ह पुन्हा लावले जाणार आहे.
वेगवेगळ्या गॅलरींमध्ये असलेले काचेचे दरवाजेही काढून टाकले जातील. सुप्रीम कोर्टाचे जुने स्वरूप पुन्हा आणण्यासाठी न्यायमूर्ती गवई यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
प्रतीक चिन्हासाठी सुद्धा वकील संघटनेने आवाज उठवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या स्थापना दिवसाच्या वेळी नवीन प्रतीक चिन्ह लावले गेले होते. त्या चिन्हामध्ये अशोकचक्र, सुप्रीम कोर्टाची इमारत आणि भारताच्या संविधानाचे चित्र होते. त्यावर लिहिले होते – “यतो धर्मो ततो जयः” (जेथे धर्म आहे, तेथेच विजय आहे).
जुन्या प्रतीक चिन्हामध्ये देखील “ यतो धर्मो ततो जयः ” हे ब्रीद होते. काहींनी आरोप केला की, मागील सरन्यायाधीश सरकारला हवे तसे निर्णय देत होते. सरकारच्या इशाऱ्यावर त्यांचे निर्णय बदलत होते. त्याबदल्यात धनंजय चंद्रचूड यांना प्राध्यापक बनवण्यात आले असून, त्यांना ३.५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

न्यायालयातील न्यायदेवतेच्या जुन्या चित्रात एका हातात तराजू होता – ज्याचे एक पारडे वर, तर दुसरे खाली होते. दुसऱ्या हातात तलवार होती आणि डोळ्यावर पट्टी होती.
न्या. धनंजय चंद्रचूड यांनी हे प्रतीक बदलले होते. नवीन प्रतीकात न्यायमूर्तीच्या हातात असलेला तराजू दोन्ही बाजूंनी सम सामान आहे आणि तलवारीच्या जागी न्यायमूर्तीच्या हातात संविधानाचे पुस्तक आहे. नवीन प्रतीकाखाली लिहिले आहे – “कानून अंधा नाही है.”
या नवीन प्रतीकात डाव्या हातातील तलवार काढून त्याजागी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढून टाकण्यात आली आहे. मूर्तीचा रंग पांढरा असून ती चौकोनी दगडावर उभी आहे. हा पांढरा रंग शांती आणि न्यायाचे प्रतीक मानला जातो.

न्या. भूषण गवई यांनी चंद्रचूड यांचे अनेक निर्णय बदलले आहेत. लोक त्यांना पसंत करत आहेत, कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सेवानिवृत्तीनंतर मला काहीच हवे नाही. महाराष्ट्र सरकारने त्यांना शिष्टाचार सुद्धा दिला नव्हता. बौद्ध धर्माचे उपासक असलेले न्यायमूर्ती गवई यांच्या निर्णयामुळे अनेकांना आनंद होत आहे.
