नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरू नये –   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

नांदेड :- देशात कोरोना विषाणूचा रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात एकूण 485 रुग्ण आढळून आले आहेत. नोंद सुरूच आहे पण नांदेड जिल्ह्यात एकही रुग्ण अद्याप पर्यंत आढळला नाही. नागरिकांनी घाबरायचे कारण नाही, काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

 

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे

 

सर्दी खोकला, ताप श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया ही मुख्यत्वे श्वसन संस्थेची निगडित असतात ही सदर सर्वसाधारणपणे एंफ्लूजा आजारा सारखीच असतात सर्दी,खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे,ताप, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.

 

कोरोना विषाणूमुळे होणारा आजार कसा पसरतो

 

आजार शिकण्या, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो.या शिवाय शिंकण्या खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिटकतात हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक, चोळण्याच्या सवयीमुळे देखील होतात.

 

काय काळजी घ्यावी

 

मास्क वापरावे, हात वारंवार धुणे, खोकलताना नाक, तोंडाला रुमाल अथवा टिशू पेपर धरणे अर्धवट शिजलेले कच्चे मास खाऊ नये, फळे भाज्या न धुता खाऊ नये. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थांबणे टाळा सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे टाळा.

अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!